Sunday, April 27, 2025
Homeगुन्हासात वर्षांपूर्वी एका अल्पवयीन मुलीला गर्भवती केले अन दिला लग्नाला नकार ;...

सात वर्षांपूर्वी एका अल्पवयीन मुलीला गर्भवती केले अन दिला लग्नाला नकार ; पोस्को व अॅट्रासिटी अंतर्गत गुन्हा दाखल!

सात वर्षांपूर्वी एका अल्पवयीन मुलीला गर्भवती केले अन दिला लग्नाला नकार ; पोस्को व अॅट्रासिटी अंतर्गत गुन्हा दाखल!

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – सात वर्षांपूर्वी एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष देऊन तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. तसेच तिच्या बहिणीशी ही प्रेम संबंध ठेवून तरुणीला पत्नी म्हणून व त्याच्यापासून जन्मलेल्या बाळाचा बाप म्हणून दर्जा देण्यास नकार देणाऱ्या तरुणाविरुद्ध पोस्को व अॅट्रासिटी कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, अमळनेर येथील शिरूड नाका परिसरातील गौरव विजय पाटील याने सन २०१७मध्ये त्यावेळी वय वर्ष १७ असलेल्या शहरातील एका मुलीसोबत प्रेमाचे संबंध ठेवले. तसेच तिला लग्न करण्याचा आग्रह केला. तसेच नाही सांगितल्यास आत्महत्येची धमकी देत असल्याने पीडित तरुणीनी सन २०१७च्या ऑगस्ट महिन्यात गौरवसोबत औरंगाबाद, रांजणगाव येथे गेली. तेथे पीडिता गर्भवती राहिली. ती सात महिन्यांची गर्भवती असताना तिने गौरवला लग्नाची गळ घातली. मात्र, त्याने लग्न केले नाही. त्यानंतर गौरवने तिला पालघर येथे त्याच्या मित्राकडे नेले. त्याचवेळी पीडितेची लहान बहिण कुणातरी पुरुषासोबत पळून गेली होती. दरम्यान, तिच्या बहिणीचे तिच्या प्रियकराशी वाद झाल्याने ती पीडिता आणि गौरव यांच्याकडे राहायला आली. त्यानंतर पीडितेची बहीण आणि गौरव यांच्यातही प्रेम संबंध जमले. पीडितेने त्याला विरोध केला असता तो तिला मारहाण करून शिवीगाळ करत होता. तर पीडिता ७ जानेवारी २०१९ रोजी कांता हॉस्पिटल येथे प्रसूत झाली अन् तिने मुलाला जन्म दिला.

मुलगा चार महिन्यांचा झाल्यावर गौरव त्यांना घेवून अमळनेर येथील राजाराम नगरमध्ये राहायला आला. मात्र, त्याला वारंवार पीडितेने पत्नीचा दर्जा आणि बाळाला मुलाचा दर्जा देण्याची विनंती केल्यावर ही त्याने नकार दिल्याने पीडितेने अमळनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून गौरव विरुद्ध पोस्को कायद्यानुसार तसेच भादंवि कलम ३७६ (२) एन तसेच अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास डीवायएसपी विनायक कोते करत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या