सात वर्षीय अयमन खान हिचे चार रोजे पुर्ण !
यावल खान्देश लाईव्ह न्युज प्रतिनिधी –
तालुक्यातील साकळी येथील इस्लामपुरा परिसरातील रहिवासी अयमन फातिमा अमजद खान हिने आपल्या आयुष्यातील चार रोजे (उपवास) पुर्ण केल्याबद्दल तीचे सर्व आप्तगणातून अभिनंदन व कौतुक होत आहे. सध्या सर्वत्र मुस्लिम धर्मियांचा पवित्र रमजान महिना सुरू असुन त्यात उन्हाच्या तीव्रतेमुळे चांगलाच कस लागला आहे परंतु इस्लाम धर्माचा पाच कर्तव्य या मधील उपवास रोजा हा एक प्रमुख कर्तव्य मानले जाते त्यामुळे उष्णतेचा तीव्रतेचा विचार न करता उपवास रोजा ठेवतात यात लहान मुलेही आपल्या आयुष्यांचा पहिला रोजा ठेवतात आपल्या वयाचा अवघ्या सातव्या वर्षी अजमन खान हिने आपला जीवनातील पहिला रोजा ठेवला. जवळपास उपवास हा 14 तासाचा असुन उपवासात पाणी पिने सुध्दा जमत नसते सध्या उन्हाचा पारा चढत असुन मोठ्या माणसाला पाण्याची तहान लागत आहे. परंतु अजमन खान हिने रमजान मधील पवित्र उपवास ठेवल्यामुळे तीचे हाजी आयुब खान गफूर खान आजोबा, व सामाजिक कार्यकर्ते वसीम खान हाजी अयूब खान, असलम खान यांची पुतनी आहे यांच्यासह इस्लामपुरा परिसरातील नागरिकांनी या चिमुकलीचे कौतुक करुन अभिनंदन केले व या वेळी अनेक आप्तेष्ठानी शुभेच्छा दिल्या.