साने गुरुजी विद्यालयाच्या पटांगणावर तसेच अनेक ठिकाणी काटेरी झुडपासह घाणीचे साम्राज्य.
स्वच्छ भारत अभियानासह आमदार अमोल जावळे यांच्या सूचना कचरा कुंडीत.
यावल दि.१२ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी शासनाने महाराष्ट्र राज्यात स्वच्छ भारत अभियान राबविण्याचे आदेश काढले आहेत तसेच आमदार अमोल जावळे यांनी सुद्धा यावल नगरपालिकेला स्वच्छ अभियान राबविण्याच्या सूचना दिल्या होत्या आणि आहे परंतु हे सर्व आदेश सूचना यावल नगरपरिषदेने कचराकुंडी टाकल्याचे दिसून येत आहे.
यावल शहरात यावल नगरपालिकेपासून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या यावल पोस्ट ऑफिस समोर,तिरुपतीनगर मधील खाजगी मोकळ्या जागांवर, प्लॉटवर पंचायत समिती कार्यालयाच्या मागील बाजूस, शहरातील व विकसित भागातील अनेक ठिकाणच्या गटारीतील घाण पाणी वाहून जात नसल्याने,अनेक ठिकाणी झाडू मारून साफसफाई होत नसल्याने अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य आणि काटेरी झाडे झुडपे मोठ्या प्रमाणात झालेली आहे याकडे यावल नगर परिषद दुर्लक्ष करीत असल्याने यावल नगरपरिषदेला स्वच्छ महाराष्ट्र अभियानाचे महत्त्व नाही का..?
अशी सर्व स्तरात चर्चा आहे.
यावल नगरपरिषद संचलित साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या संरक्षक भिंतीला लागूनच व समोरील पटांगणावर काटेरी झाडे झुडपे मोठ्या प्रमाणात झाली आहे तसेच ठीक ठिकाणी घाण कचरा सुद्धा साचून आहे विद्यालयाच्या प्रवेशद्वारा समोर मोकळ्या जागेवर पुरुष,स्त्रिया,मुलं प्रातकाल विधी करीत असल्याने ( गुड मॉर्निंग पथक नियुक्त नसल्याने ) विद्यालयात येणारे,जाणारे बारावी परीक्षा देणारे विद्यार्थी,विद्यार्थिनी,
शिक्षक,विचार कर्मचारी वर्ग दुर्गंधीयुक्त घाणीने त्रस्त झाले असून विद्यार्थ्यांमार्फत साथीचे रोग पसरून आरोग्य धोक्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झालेली असताना मात्र याकडे यावल नगरपरिषद साफसफाई स्वच्छता विभाग दुर्लक्ष करीत असल्याने संपूर्ण यावल शहरात सर्व स्तरात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे, याकडे आमदार अमोलदादा जावळे यांनी यावल नगरपरिषद मुख्याधिकारी यांना प्रत्यक्ष घटनास्थळी नेऊन पाहणी केल्यास वस्तुस्थिती आणि यावल नगर परिषदेची साफसफाईची चमकोगिरी आणि दिलेल्या सूचना लक्षात आल्याशिवाय राहणार नाही.