Thursday, March 27, 2025
Homeजळगावसाने गुरुजी विद्यालयात इयत्ता बारावी परीक्षेसाठी बैठक व्यवस्था झाली निश्चित.

साने गुरुजी विद्यालयात इयत्ता बारावी परीक्षेसाठी बैठक व्यवस्था झाली निश्चित.

साने गुरुजी विद्यालयात इयत्ता बारावी परीक्षेसाठी बैठक व्यवस्था झाली निश्चित.

परीक्षा केंद्राबाहेर ड्रोन कॅमेरे द्वारे शूटिंग होणार…

यावल दि.९  खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी यावल येथील साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता बारावी परीक्षा मंगळवार दि.११ फेब्रुवारी २०२५ पासून सुरू होणार असून या वेळेला शिक्षण विभागाच्या आदेशानुसार परीक्षा केंद्राच्या बाहेर ड्रोन कॅमेरे द्वारे शूटिंग केली जाणार असल्याने कॉपी पुरवणाऱ्यांना चांगलाच कायदेशीर दणका बसणार आहे.

यावल नगर परिषद संचलित पीएमश्री साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात परीक्षा केंद्र
क्रमांक ०८११ या ठिकाणी इ.१२ वी परिक्षा फेब्रु / मार्च-२०२५ मंगळवार दि.११ फेब्रुवारी२०२५ पासून येथे सुरु होत आहे. या परिक्षा केंद्रावर पीएमश्री साने
गुरुजी माध्य व उच्च माध्य विदयालय व सरस्वती विदया मंदीर यावल येथे प्रवेश पत्र भरलेल्या कला,विज्ञान,वाणिज्य व खाजगी असे एकुण ४११ विदयार्थ्याची परिक्षा बैठक व्यवस्था करण्यात
आली आहे.या वर्षी परिक्षा कालावधीत ड्रोन कॅमेरेव्दारे शुटींग केली जाणार असून परिक्षा
केद्रांपासून ५०० मीटर परिसरामध्ये १४४ कलम लागू असणार आहे.म्हणून पालकांनी परिक्षा
केंद्रापासून ५०० मीटर अतंरावर थांबू नये.तसेच विदयार्थ्यांनी परिक्षा केंद्रावर पेपर सुरु होण्याच्या
आधी अर्धा तास अगोदर उपस्थित राहावे.असे आव्हान केंद्रसचांलक तथा मुख्याध्यापक यावल नगर
परिषद संचलित,पीएमश्री साने गुरुजी माध्य व उच्च माध्य विदयालयातील परीक्षा केंद्राचे चीप कंडक्टर तथा मुख्याध्यापक एम. के.पाटील सर यांनी केले आहे.

बैठक व्यवस्था खालील प्रमाणे
कला शाखा परिक्षा क्रमांक – S137015 To S137210
वाणिज्य शाखा परिक्षा क्रमांक – S162422 To S162503
विज्ञान शाखा परिक्षा क्रमांक S078100 To S078234

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या