सामंजस्य करारांतर्गत यावल महाविद्यालयातील विद्यार्थ्यानी बनविले ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत शेतकरी ओळखपत्र
यावल दि.२८ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
यावल तहसील आणि कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय , यावल संयुक्त विद्यमाने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बनविले शेतकरी ओळखपत्र. मराठा विद्या प्रसारक सह समाजाचे यावल येथील कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आणि यावल तहसील यांच्यात सामंजस्य करार ( MOU ) असल्याने यावल महाविद्यालयातील प्र.प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे व यावल तहसीलदार सौ.मोहनमाला नाझीरकर यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र शासनाच्या ॲग्रीस्टॅक योजने अंतर्गत शेतकरी माहिती संच आणि शेतकरी ओळखपत्र तयार करण्याचे काम महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केले.केंद्र शासन व राज्य शासनाच्या विविध लाभाच्या योजने करिता हे शेतकरी ओळखपत्र अत्यंत महत्वाचे असल्यामुळे ते शेतकऱ्यांना भविष्यात महत्त्वाचे ठरेल यासाठी हे ओळखपत्र बनविण्यात आले . सदर कार्यक्रमासाठी उपप्राचार्य.
प्रा.एम.डी.खैरनार,उपप्राचार्य डॉ.एस.पी कापडे,प्रा.नरेंद्र पाटील,प्रा.हेमंत पाटील,प्रा.प्रशांत मोरे प्रा.अक्षय सपकाळे व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.