Sunday, April 27, 2025
Homeजळगावसामंजस्य कराराअंतर्गत यावल महाविद्यालयात २१ मार्च जागतिक वन दिवस साजरा

सामंजस्य कराराअंतर्गत यावल महाविद्यालयात २१ मार्च जागतिक वन दिवस साजरा

सामंजस्य कराराअंतर्गत यावल महाविद्यालयात २१ मार्च जागतिक वन दिवस साजरा

यावल दि.२१      खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी.   येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सह समाज संचलित कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्र.प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली वन विभाग व यावल महाविद्यालय यांच्या सामंजस्य कराराअंतर्गत वन दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाला महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.एम.डी.खैरनार,डॉ. सुधीर कापडे मंचावर उपस्थित होते.बी.बी.गायकवाड (आगार वनरक्षक ) यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की २१ मार्च जागतिक वन दिवस मानव व वन्यजीव संघर्ष यातील जनजागृती संदर्भात पाळला जातो.बिबट्या तीन फुट उंच प्राण्यांच्या मानेवर हल्ला करतो माणसाने नेहमीच गळ्यात मफलर किंवा जाड फडके वापरावे,साकळी परीसरात लहान मुलावर झालेला हल्ला ह्या संदर्भात माहिती दिली
राजेंद्र खर्चे (वनपरिमंडळ,
अधिकारी ) यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की जंगलातील औषधी वनस्पती,फळे, फुले,कंदमुळे,रानभाज्या,वाळलेले जळाऊ लाकूड,डिंक,लाख हे जंगलातून मिळते दरवर्षी १३ दशलक्ष हेक्टर वन क्षेत्र नष्ट होते ३० % वन पृथ्वीवर आहे.
मानववस्ती वाढते तशा गरजा वाढल्या आहेत.बांबू,गवत ,
कुरण,काटेरी वन,ओझोन थर,वनवे शिकार,वनस्पती नुकसान, प्राण्यांची हानी होते.जंगल कमी झाल्यामुळे निवारा नष्ट होतो गावातील रस्त्याच्या कडेला घाण फेकू नये,मेंढपाळ,बकरी चारणारे गुराखी यांनी काळजी घेतली पाहिजे.स्वप्नील फटांगरे ( वन परिक्षेत्र अधिकारी यावल पुर्व )
मानव व वन्यजीव संघर्ष यातील तरूणांची भूमिका.या विषयावर मार्गदर्शन करताना घटना टाळण्यासाठी उपाययोजना करावी लागते,तरस,बिबट्या,रानमांजर, लांडगा,रानमांजर,यांचे ठसे ओळखून सावध रहावे
सातपुडा पर्वताच्या जंगलात वेगवेगळ्या वनस्पतीसृष्टी आहे.वेगवेगळे झाड साग पानांना लवकर आग लागते,वृक्षतोडीमुळे अधिवास नष्ट होतो.अतिक्रमण, वृक्षतोड थांबवणे,याविषयी जनजागृती करण्याचे त्यांनी आवाहन केले कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाच्या प्र.प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ग्रामीण भागातील खेड्यात राहणारा बेजबाबदार समाजाकडून न कळत आगी लागल्या की दुर्लक्ष करतो अशा वेळी वनविभागाला कळवावे वनव्यात,हरीण,ससा,खार,पक्षी हे प्राणी जंगलात आग लागली की जळतात,किंवा दुसऱ्या जंगलात वेगवेगळ्या ठिकाणी निघून जातात. उष्णता वाढली झाडं लावली पाहिजे,जनजागृती केली पाहिजे, वनविभागाचे कायदे अभ्यासले पाहिजे,माकड,हरीण हे प्राणी जंगलात कमी होत आहेत असे सांगून प्लास्टिक पिशव्या, बाटल्या,चहाचे कप याविषयी स्वच्छता केली पाहिजे
कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात पी. पी.टी.स्लाईड्सवर मार्गदर्शन करताना वन परिक्षेत्र अधिकारी स्वप्निल फटांगरे यांनी उस लागवडील मळे,शेतकरी शेतात एकट्याने काम करू नये,पाळीव प्राणी गोठ्यात बंदीस्त ठेवणे, स्वच्छता राखणे,उंदीर,घुशी,डुक्कर अशा प्राण्यांवर बिबट्या हल्ला करतो.चुकीच्या बातम्या पसरवू नका असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा.प्रतिभा रावते यांनी केले तर आभार डॉ.निर्मला पवार यांनी मानले.यावेळी कार्यक्रमाला डॉ.आर.डी. पवार,डॉ.प्रल्हाद पावरा,प्रा.मनोज पाटील,प्रा.राजु तडवी,प्रा.सोनाली पाटील,प्रा इमरान खान,डॉ.मयूर सोनवणे,डॉ. संतोष जाधव,प्रा.सुभाष कामडी प्रा.हेमंत पाटील,प्रा.अक्षय सपकाळे,प्रा.अर्जुन गाढे उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मिलिंद बोरघडे,संतोष ठाकूर, दुर्गादास चौधरी,प्रमोद भोईटे, प्रमोद कदम,अनिल पाटील,प्रमोद जोहरे,अमृत पाटील,रमेश साठे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या