Monday, March 24, 2025
Homeजळगावसामंजस्य कराराअंतर्गत विद्यार्थिनींनी घेतली गटविकास अधिकाऱ्यांकडून विविध योजनांची माहिती

सामंजस्य कराराअंतर्गत विद्यार्थिनींनी घेतली गटविकास अधिकाऱ्यांकडून विविध योजनांची माहिती

सामंजस्य कराराअंतर्गत विद्यार्थिनींनी घेतली गटविकास अधिकाऱ्यांकडून विविध योजनांची माहिती

यावल दि.११    खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी.    येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सह समाजाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यावल व पंचायत समिती सामंजस्य कराराअंतर्गत प्र. प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली, BDO सौ. मंजुश्री गायकवाड यांनी विविध योजनांची माहिती दिली. सुरुवातीला गायकवाड यांनी पंचायत राज हे त्रिस्तरीय रचना आहे. त्यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत हे तीन भाग यामध्ये आहे पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी काम करतात. तर जिल्हा परिषद मध्ये सीईओ काम करतात. पंचायत समितीला स्वतःचे असे उत्पन्न नसते पंचायत समितीमार्फत पशुसंवर्धन, आरोग्य विभाग, कृषि विभाग, समाज कल्याण विभाग असे अनेक विभाग कार्य करतात. योजनांमध्ये घरकुल योजना, रमाई योजना, शबरी योजना, प्रधानमंत्री आवास योजना, मोदी आवास योजना, विशेष घटक योजना, महात्मा गांधी ग्रामीण हमी योजना, बायोगॅस योजना, स्वच्छ भारत योजना इ. योजनांची माहिती सौ.गायकवाड यांनी दिली. प्रत्येक योजनेला निकष असतात. त्या निकषाला अनुसरून त्या योजनांचा फायदा ग्रामीण भागातील व्यक्तींना दिला जातो. या कार्यक्रमाला सहाय्यक गटविकास अधिकारी श्री. बा. क. पवार, सहाय्यक प्रशासन अधिकारी श्री.ज्ञानेश्वर निळे, कनिष्ठ लिपिक समाज कल्याण विभाग श्री. शब्बीर तडवी आदी कार्यक्रमाला उपस्थित होते. प्रा. प्रतिभा रावते यांनी सूत्रसंचालन केले. आभार डॉ. वैशाली कोष्टी यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य प्रा. एम. डी. खैरनार , डॉ. हेमंत भंगाळे , डॉ. आर डी पवार , डॉ. पी. व्ही. पावरा, प्रा. अर्जुन गाडे, प्रा. हेमंत पाटील, प्रा. सि. टी. वसावे, प्रा. नरेंद्र पाटील, प्रा. सुभाष कामडी यांनी सहकार्य केले

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या