Sunday, April 27, 2025
Homeजळगावसावखेडासीम येथील इसमाने औषधी द्रव्य घेऊन केली आत्महत्या.

सावखेडासीम येथील इसमाने औषधी द्रव्य घेऊन केली आत्महत्या.

सावखेडासीम येथील इसमाने औषधी द्रव्य घेऊन केली आत्महत्या.

यावल दि .१५ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
तालुक्यातील सावखेडासिम येथील ४२ वर्षीय इसमाने विषारी पदार्थ सेवन करून आत्महत्या केल्याची घटना दि.१४ रोजी घडली.
याबाबत यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे सावखेडासिम येथील किरण उत्तमराव पाटील वय ४२ याने त्याचे स्वतःचे गुरांचे गोठात असलेले विषारी औषध सेवन केले असता त्या यावल येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले पुढील उपचारासाठी जळगाव येथील सामान्य रुग्णालयात त्यास दाखल केले असता आज बुधवार दि.१५ रोजी सकाळी ५ वाजेचे सुमारास तो मयत झाला याबाबतची खबर दिनेश पाटील यांनी दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे किशोर पाटील यांचा लहान बंधू गेल्या आठ ते दहा वर्षांपूर्वी विहिरीत पडून मयत झाला होता हे दोघे भाऊ होते दोघ भाऊही आत्महत्या करून मयत झाले आहेत त्यामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे किशोर पाटील चे पश्चात आई-वडील पत्नी मुलगा मुलगी असा परिवार असून ते भूषण आणि अविनाश यांचे चुलत भाऊ होत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या