Tuesday, April 29, 2025
Homeजळगावसावखेडा येथे शिवसेना  शिंदे गटात  अनेक महिलांचा प्रवेश.

सावखेडा येथे शिवसेना  शिंदे गटात  अनेक महिलांचा प्रवेश.

सावखेडा येथे शिवसेना  शिंदे गटात  अनेक महिलांचा प्रवेश.

रावेर खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
रावेर लोकसभा महिला जिल्हाध्यक्षा नंदाताई प्रकाश निकम यांचे नेतृत्वाखाली असंख्य महिलांचा शिवसेना ( शिंदे गट ) जाहीर प्रवेश झाला आहे .

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे , मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील तसेच रावेर लोकसभा शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांचे प्रेरणेने आणि नेतृत्वावर विश्वास ठेऊन तसेच रावेर लोकसभा महिला जिल्हाध्यक्ष नंदाताई निकम यांच्या नेतृत्वाखाली दि. 2 जानेवारी रोजी संध्याकाळी 6 वाजता पार पडलेल्या कार्यक्रमात सावखेडा ता : रावेर येथील असंख्य महिलांनी शिवसेना ( शिंदे गटात ) जाहीर प्रवेश केला .
या प्रसंगी शिवसेना रावेर तालुका प्रमुख स्वाती भंगाळे, सावखेडा शहर प्रमुख रुपाली महाजन, यावल तालुका महिला आघाडी प्रमुख पूजा पाटील, रावेर तालुका उपप्रमुख निखिल नेमाडे, रावेर यावल तालुका समन्व्यक भगवान पाटील, फैजपूर शहर प्रमुख पिंटूभाऊ मंडवले, फैजपूर युवा सेनाप्रमुख कैलासभाई व सावखेडा शहरप्रमुख चिराग महाजन व असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.

 


या प्रसंगी भारती नरेंद्र भामरे ,शिल्पा महाजन, ललिता रमेश महाजन,कविता मनोज नहाले,माया कैलास हिवरे , सिंधूबाई कमलाकर महाले,यशोदाबाई चुडामण पाचपांडे , सुशीला पंडित वानखेडे ,सुवर्णा अशोक कराड , प्रतिभा रवींद्र कराड ,साधना पाटील ,रुपाली केशव महाजन , नंदाबाई धीरज कराड या कर्तृत्ववान महिलांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे .या प्रवेशानं रावेर तालुक्यात शिवसेनेचे वर्चस्व वाढले आहे .

शिवसेना रावेर तालुकाप्रमुख वाय. व्ही. पाटील जिल्हा समन्व्यक प्रवीण पंडित आणि तालुका संघटक राहुल पाटील आदी उपस्थित होते .

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या