सावधान : शहरात बनावट तुपाची विक्री
धरणगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – हिवाळ्यात अनेक जण सुकामेव्याचे व गावरान तुपाचे लाडू खाणे पसंत करतात. ग्रामीण भागात अनेक फिरत्या विक्रेत्यांकडून गावरान तुपाच्या नावाखाली बनवत भेसळयुक्त तुपाची विक्री होऊन नागरिकांची फसवणूक होत आहे.
रवा व वनस्पती तुपाची भेसळ करून बनावट गावरान तुपाची विक्री होते. या तुपामुळे मात्र नागरिकांच्या आरोग्यास धोका असून या प्रकाराकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. लाडू बनविण्यासाठी गावरान तुपाचा वापर करावा असा अनेकांचा प्रयत्न असतो, मात्र त्याची किंमत सर्वसामान्यांना परवडेल अशी नसते याचाच फायदा फेरीवाले उचलतात. गावरान तूपविक्री करणाऱ्या फेरीवाल्यांमध्ये खास करून महिलांचा समावेश असतो. अनेक दुकानांवर गावरान तूप मिळते. मात्र या तुपाच्या दर्जाची तपासणी अन्न व प्रशासन विभागामार्फत होत नाही. याचाच फायदा अनेक दुकानदार घेतात व ग्राहकांची लूट होते.