Monday, March 17, 2025
Homeजळगावसिमेंटच्या टँकरचा भीषण अपघात : चालकासह पादचारी ठार !

सिमेंटच्या टँकरचा भीषण अपघात : चालकासह पादचारी ठार !

सिमेंटच्या टँकरचा भीषण अपघात : चालकासह पादचारी ठार !

एरंडोल खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – जळगावकडून भरधाव वेगाने जाणाऱ्या सिमेंटच्या टँकरने महामार्गालगतच्या दुकानास जबर धडक दिली. या दुर्घटनेत टँकरचालक फुलचंद (२६, चिलुला, जि. बाराबंकी) हा जागीच ठार झाला, तर पादचारी शकील नबी बागवान (३४, एरंडोल) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

अमळनेर नाक्यानजीक असलेल्या गतिरोधकाजवळ चालकाचे वेगावर नियंत्रण न राहिल्याने मंगळवारी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. यादरम्यान, अमळनेर नाका परिसरात महामार्गावरील पथदीप बंद असल्याने याठिकाणी याआधीही अनेक अपघात झाले आहेत. सिमेंट घेऊन जाणाऱ्या टँकरवरील चालकाचा (एमएच १५ जेसी १९९५) गतिरोधकावर ताबा सुटल्याने तो आसारीच्या दुकानात घुसला. त्यात चालक हा जागीच ठार झाला. शकील व आई दोघे रात्री परगावावरून आल्यावर रस्त्याने चालत असताना अपघात झाला. शकील हा मागील चाकाखाली आल्याने दोन्ही पाय निकामी झाले. जळगाव येथे खासगी दवाखान्यात उपचार घेताना त्याचा मृत्यू झाला.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या