Sunday, March 16, 2025
Homeगुन्हासुकी नदीच्या पात्रात धाड टाकून वाळूचे ट्रॅक्टर जप्त

सुकी नदीच्या पात्रात धाड टाकून वाळूचे ट्रॅक्टर जप्त

सुकी नदीच्या पात्रात धाड टाकून वाळूचे ट्रॅक्टर जप्त

रावेर खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – तालुक्यातील चिनावल शिवारातील वडगाव रस्त्यावरील सुकी नदीच्या पात्रातून वाळूचे अवैध उत्खनन व वाहतूक सुरू असल्याच्या तक्रारींची दखल घेत तहसीलदार बंडू कापसे यांनी तीन तलाठींसह शुक्रवारी पहाटे चार वाजता या ठिकाणी धाड टाकली.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, यावेळी त्यांनी आलेल्शा शाहरूख शेख सगीर (रा. चिनावल, ता. रावेर) यास ट्रॅक्टरसह ताब्यात घेतले. चिनावल शिवारातून ट्रॅक्टरवर बसून तहसील कार्यालयापर्यंत तहसीलदार बंडू कापसे यांनी हे ट्रॅक्टर आणले व जप्त केले. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी आटोपताच सुकी नदीपात्रात ही करवाई केली. यावेळी तहसीलदार कापसे व तलाठी स्वप्नील परदेशी आणि गुणवंत बारेला (रावेर सजा) तथा गोपाळ भगत (खानापूर सजा) यांच्यासह दोन मोटारसायकलवर कडाक्याच्या थंडीत वडगाव मार्गे चिनावल जाणाऱ्या मार्गाने जाऊन थेट सुकी नदीपात्रात टॉर्च बॅटऱ्या सोबत घेऊन धाड टाकली. दरम्यान, अशा प्रकारची कारवाई ही नेहमीच करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या