Sunday, April 27, 2025
Homeगुन्हासेटअप बॉक्स लावण्याच्या वादातून तिघांना मारहाण

सेटअप बॉक्स लावण्याच्या वादातून तिघांना मारहाण

सेटअप बॉक्स लावण्याच्या वादातून तिघांना मारहाण

अमळनेर खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – तालुक्यातील शिरसाळे येथे घराच्या सामाईक भिंतीवर सेटअप बॉक्स लावण्याच्या वादातून तिघांना मारहाण करण्यात आली. ही घटना बुधवारी दुपारी घडली. याप्रकरणी तिघांवर अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, शिरसाळे येथील आबा कौतिक महाले (वय ४७) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, बुधवारी सामाईक भिंतीवर सेटअप बॉक्स लावत असताना त्याचा आवाज झाला. तो ऐकून शेजारी रितेश महाले व मंगला सुभाष महाले यांनी कुटुंबीयांना शिवीगाळ सुरू केली. यानंतर सुभाष महाले मद्यधुंदीत काठी घेऊन तर रितेश महाले हा लोखंडी रॉड घेऊन आला. दोघांनी मारहाण करायला सुरुवात केली. दरम्यान, आई व मुलगा सोडवायला आले असता त्यांनाही मारहाण करण्यात आली. यात आबा महाले यांच्या डोक्याला व उजव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली. याप्रकरणी मारवड पोलिसांत संशयित सुभाष एकनाथ महाले, रितेश सुभाष महाले, मंगला सुभाष महाले या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या