Tuesday, April 29, 2025
Homeगुन्हासैफ अली खानवर हल्ला करणाऱ्याला अटक : बांगलादेशी असल्याचा संशय

सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्याला अटक : बांगलादेशी असल्याचा संशय

सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्याला अटक : बांगलादेशी असल्याचा संशय

मुंबई वृत्तसंस्था – बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानच्या घरावर हल्ला करणाऱ्या आरोपीला शनिवारी रात्री उशिरा ठाण्यातून अटक करण्यात आली. याबाबत मुंबई पोलिसांनी पत्रकार परिषद घेतली. पोलिसांनी सांगितले की, आरोपी चोरीच्या उद्देशाने अभिनेत्याच्या घरात घुसला होता. त्याच्याकडे भारतातील कोणताही वैध कागदपत्र नाहीत. तो बांगलादेशी असल्याचा संशय आहे.

पोलिसांनी असेही सांगितले की त्याचे खरे नाव मोहम्मद शहजाद आहे, जो 30 वर्षांचा आहे. तो पहिल्यांदाच सैफच्या अपार्टमेंटमध्ये शिरला. त्याने आपले नाव बदलून विजय दास असे ठेवले. तो ५-६ महिन्यांपूर्वी मुंबईत आला होता. इथे तो एका हाऊसकीपिंग एजन्सीमध्ये काम करतो.यापूर्वी शनिवारी पोलिसांनी छत्तीसगडमधील दुर्ग येथून एका संशयिताला ताब्यात घेतले होते. पोलिसांनी आतापर्यंत सुमारे 50 जणांची चौकशी केली आहे. याप्रकरणी 35 पथके तैनात करण्यात आली होती.१५ जानेवारीच्या रात्री आरोपी सैफ अली खानच्या वांद्रे येथील घरात घुसला. आरोपीने सैफवर चाकूने हल्ला केला. त्याच्या मानेवर, पाठीवर, हातावर, डोक्यावर सहा ठिकाणी वार करण्यात आले. रात्रीच त्यांना रुग्णालयात नेण्यात आले.

लीलावती रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, सैफच्या पाठीच्या कण्यामध्ये चाकूचा तुकडा अडकला होता. तो शस्त्रक्रियेद्वारे काढण्यात आला आहे. डॉक्टरांनी सांगितले की अभिनेत्याच्या मणक्यामध्ये चाकू 2 मि.मी. आणखी बुडाला असता तर पाठीच्या कण्याला मोठे नुकसान होऊ शकले असते. पोलिसांनी शनिवारी छत्तीसगडमधील दुर्ग येथून एका संशयिताला ताब्यात घेतले. आरपीएफचे प्रभारी संजीव सिन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयिताला शालीमार ज्ञानेश्वरी एक्स्प्रेसमधून पकडण्यात आले. ही व्यक्ती जनरल डब्यात बसली होती. मुंबईहून पाठवलेल्या छायाचित्रांच्या आधारे त्याची ओळख पटली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या