सोनसाखळी चोरीचे गुन्ह्यातील अट्टल आरोपीस भुसावळ बाजारपेठ पोलिसांकडून अटक
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – भुसावळ शहरातील खडका रोड भागातील मुस्लिम कॉलनी भागातील अट्टल आरोपी विरुद्ध अमळनेर व जलंब या दोघेही पोलीस ठाण्यात सोनसाखळी चोरीचे गुन्हे दाखल अट्टल आरोपीस बाजारपेठ ठाण्याचे गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतले आहे.
मझर अब्बास जाफर असे अट्टल आरोपीचे नाव आहे.
बाजारपेठ ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांना गोपनीय माहिती मिळाली की, चोरीच्या गुन्ह्यातील अट्टल आरोपी हा भुसावळ शहरात खुले आम फिरत आहे.
या संदर्भात गुन्हे शोध पथकातील अधिकारी मंगेश जाधव, पोलीस हवालदार विजय नेरकर, प्रशांत परदेशी, योगेश माळी, सचिन चौधरी, अमर अढाळे अशांना दालनात बोलावून कारवाई करण्याचे आदेश दिले होते. सदरील पथकाने अट्टल आरोपीची महिती काढून मुस्लिम कॉलनी भागात जावुन आरोपीस ताब्यात घेतले.
पोलिसांनी खाकी दाखवताच संशयित अट्टल गुन्हेगाराने कबुली दिली असून अमळनेर पो.स्टे. हद्दीत ९० हजार रुपये किंमतीची १२ ग्रॅम वजनांची सोन्याची पोत तसेच जलंब पो.स्टे. हद्दीत ७० हजार रुपये किंमतीचे १४.०५ ग्रॅम वजनांचे सोन्याची चैन असे एकुन एक लाख साठ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरी केलेले आहे.
सदरील अट्टल आरोपीस बाजारपेठ पोलिसांनी अमळनेर पोलिसांच्या स्वाधीन केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे .