सोन्याच्या भावात आणखी वाढ !
जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – देशभरात महागाई मोठ्या प्रमाणात होत असतांना आता एकीकडे सोन्याच्या भावात वाढ होत असताना चांदीच्या भावात शुक्रवारी एक हजार रुपयांची घसरण होऊन ती ९१ हजार ५०० रुपये प्रति किलोवर आली. सोन्याच्या भावात मात्र ३०० रुपयांची वाढ होऊन ते ८० हजार ८०० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले.
गेल्या बुधवारी सोने ८० हजार ६०० रुपये अशा उच्चांकी भावावर पोहोचले होते. त्यानंतर गुरुवारी त्यात १०० रुपयांची घसरण होऊन ते ८० हजार ५०० रुपये प्रति तोळा झाले. मात्र, शुक्रवारी त्यात पुन्हा ३०० रुपयांची वाढ झाली व ते ८० हजार ८०० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले आहे.दुसरीकडे मात्र चांदीचे भाव एक तर स्थिर राहत आहेत किंवा त्यात घसरण होत आहे. बुधवारी सोने उच्चांकावर पोहोचले तरी चांदी त्या दिवशी व गुरुवारीदेखील ९२ हजार ५०० रुपयांवर स्थिर होती. मात्र, शुक्रवारी चांदीच्या भावात एक हजार रुपयांनी घसरण होऊन ती ९१ हजार ५०० रुपये प्रति किलोवर आली.