सोमवारी आरटीई २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सोडत.
यावल दि.८ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी सोमवार दि.१० फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता सन २०२५- २६ शैक्षणिक वर्षासाठी आरटीई २५ टक्के ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची सोडत होणार आहे आणि यासाठी संबंधित सर्व यंत्रणेला व्ही.सी.ची.लिंक सुद्धा उपस्थित करून दिली जाणार असल्याचे महाराष्ट्र राज्य शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी नमूद केले आहे.
उपरोक्त विषयान्वये पुणे येथील महाराष्ट्र राज्य शिक्षण संचालक प्राथमिक शरद गोसावी यांनी काढलेल्या आदेशात नमूद केले आहे की,बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार, दरवर्षीप्रमाणे २५ टक्के प्रवेश प्रक्रिया संपूर्ण राज्यात ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहे. त्यानुसार सन २०२५-२६ शैक्षणिक वर्षासाठी आरटीई २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची सोडत (लॉटरी) सोमवार दि.१० फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद ( विद्या प्राधिकरण ) पुणे येथे काढण्यात
येणार आहे. सदर सोडतीचे थेट प्रक्षेपण व्ही.सी.द्वारे करण्यात येणार आहे.आपण स्वतःया कार्यक्रमास ऑनलाईन
उपस्थित रहावे.आपणांस व्ही.सी. ची लिंक यथावकाश उपलब्ध करुन देण्यात येईल.असे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग प्रधान सचिव तसेच शिक्षण आयुक्त,एनआयसीचे तांत्रिक संचालक यांना दिलेल्या आदेश वजा पत्रात प्राथमिक शिक्षण विभाग संचालक शरद गोसावी यांनी नमूद केले आहे.