सोशल मीडियाचा दुरुपयोग करणाऱ्यावर कडक कारवाई होणार
–सपोनि रामेश्वर मोताळे
रमजान ईद व गुढीपाडवा निमित्त आयोजित शांतता समितीच्या बैठकीत पोलिसांचा ईशारा
फैजपूर : खान्देश लाईव्ह प्रतिनिधी
आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया हा संवादाचा प्रभावी माध्यम बनला असला तरी त्याचा उपयोग समाज घडवण्यासाठी व्हावा, विघटनासाठी नव्हे. काही वेळा अफवा, खोट्या बातम्या किंवा द्वेषपूर्ण पोस्ट्स द्वारे दोन जाती-धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. आपण सर्वांनी जबाबदारीने वागून अशा गोष्टींना थांबवले पाहिजे असे आवाहन फैजपूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांनी केले.
ते फैजपूर येथे रमजान ईद व गुढीपाडवा निमित्त आयोजित शांतता समितीच्या बैठकीत बोलत होते. रामेश्वर मोताळे म्हणाले की, सोशल मीडियाच्या काळात सामाजिक एकोपा हा महत्वाचा विषय आहे. दुसऱ्या समाजाचा अनादर होणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच सण उत्सव साजरे करतांना नकारात्मक विचार न करता सकारात्मक विचार करावा आणि नियमांचे भान ठेवावे शांततेत तसेच उत्साहात सण उत्सव साजरे करावे. असे त्यांनी मनोगतातून व्यक्त केले. यावेळी माजी नगराध्यक्ष पी के चौधरी, अंबिका दूध संस्थेचे संचालक पप्पू चौधरी, शेख अबूबकर जनाब, सैय्यद कौसर अली, माजी उपनगराध्यक्ष केतन किरंगे यांनी मनोगत व्यक्त केले. दरम्यान शांतता समितीच्या बैठकीत रमजान ईद साठी ईदगाह मैदान परिसर यासह सर्वच सणासुदीच्या दिवशी शहरात साफसफाई व्हावी तसेच शहरातील प्रमुख रस्त्यांवर रहदारीला अडथळा ठरणार नाही. यासाठी सुरळीत रहदारीसाठी योग्य प्रयत्न होणे गरजेचे आहे. अशा सूचना बैठकीत मांडण्यात आल्या. यावेळी व्यासपीठावर सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे, पोलीस उपनिरीक्षक मैनुद्दीन सैय्यद, विनोद गाभणे तर बैठकीला माजी नगरसेवक डॉ. शेख इमरान, डॉ. दानिश शेख, माजी भाजपा शहर अध्यक्ष अनंता नेहेते, माजी नगरसेवक संजय रल, अजमत खां, विकासो संचालक नरेंद्र चौधरी, काँग्रेस शहर अध्यक्ष शेख रियाज, काँग्रेसचे माजी शहर अध्यक्ष सैय्यद कौसर अली, प्रा.असलम तडवी, काँग्रेस शहर उपाध्यक्ष शेख आसिफ मॅक्निकल, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष शेख शाकिर, पी आर पी अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष शेख आरिफ, शेख कलिम, सामाजिक कार्यकर्ते रईस मोमीन, शेख एजाज सर, शेख आरिफ, शेख रशिद, जाबिर कुरेशी, शेख अबूबकर जनाब, शिवसेना शिंदे गट शहर अध्यक्ष पिंटू मंडवाले, रशिद बाबू तडवी, पोलीस पाटील सुरेश खैरनार पाडळसे, लक्ष्मण लोखंडे भालोद, अरफान तडवी बोरखेडा बुद्रुक, नरेश मासोडे मारूळ, हरीश चौधरी पिंपरुड, प्रसन्न कुमार पाटील हंबर्डी, संजय चौधरी न्हावी, संतोष सुरवाडे करंजी, विशाल जवरे पिळोदे, अरुण पाटील चिखली, रवींद्र सावळे चिखली बुद्रुक यांच्यासह शांतता समिती सदस्य तसेच शहरातील पत्रकार आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन सेवानिवृत्त मुख्याध्यापक गणेश गुरव यांनी केले. आभार पोलीस उपनिरीक्षक मैनुद्दीन सैय्यद यांनी मानले. यशस्वीतेसाठी गोपनीय पोलिस विजय चौधरी व फैजपूर पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी तसेच होमगार्ड यांनी परिश्रम घेतले.
——–
आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया हा संवादाचा प्रभावी माध्यम बनला आहे. खरं-खोटं पडताळा, कोणतीही माहिती फॉरवर्ड करण्यापूर्वी तिची सत्यता तपासा, द्वेष पसरवणाऱ्या पोस्ट्स टाळा अशा पोस्ट्सवर प्रतिक्रिया देऊ नका किंवा त्याचा प्रसार करू नका, एकता वाढवा, सामाजिक ऐक्य वाढवणाऱ्या आणि सकारात्मक संदेशांचा प्रसार करा. सोशल मीडियाचा दुरुपयोग करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
–रामेश्वर मोताळे,सहाय्यक पोलीस निरीक्षक,फैजपूर
——