स्व. स्वप्नील ललवाणी यांच्या स्मृतिदिनानिमीत्त अन्नदान
भुसावळ :प्रतिनिधी येथील श्रीमती प.क. कोटेचा महिला महाविद्यालयाचे माजी प्रभारी प्राचार्य प्रा.डॉ. डि.एम.ललवाणी यांच्या कनिष्ठ पुत्र स्व. स्वप्निल ललवाणी याच्या चौथ्या स्मृतीदिनानिमित्त जळगाव येथील केशव प्रतिष्ठान संचलित मातोश्री वृद्धाश्रमामध्ये सकाळच्या जेवणाचे अन्नदान करून त्याच्या स्मृतीला अभिवादन करण्यात आले. अतिशय गंभीर व शांत वातावरणात वृद्धाश्रमातील सर्व ज्येष्ठ नागरिकांनी स्व. स्वप्निलच्या स्मृतीस मंत्र पठण व प्रार्थना म्हणुन श्रध्दांजली अर्पण केली. याप्रसंगी ललवाणी परिवाराचे अर्ध्वयु मदनलालजी ललवाणी ,प्रा. डॉ. दिलीप ललवाणी, किड्स गुरुकुलचे इंटरनँशनलचे अध्यक्ष आदेश ललवाणी व संचालिका हर्षा ललवाणी उपस्थित होते. तसेच मातोश्री वृद्धाश्रमाचे कर्मचारी रोहन सोनगडा यांनी स्वप्नीलच्या आठवणींना ऊजाळा दिला. किरण तोडकरी व सेवक
सुमेरसिंग पाटील, पंकज पाटील, राकेश भोई, सागर भोई, प्रवीण धनगर आदींनी सहकार्य केले.