Monday, March 24, 2025
Homeगुन्हाहद्दपार असताना शहरात फिरणाऱ्याला सराईत गुन्हेगाराला अटक !

हद्दपार असताना शहरात फिरणाऱ्याला सराईत गुन्हेगाराला अटक !

हद्दपार असताना शहरात फिरणाऱ्याला सराईत गुन्हेगाराला अटक !

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार असताना जळगाव शहरात फिरणाऱ्या महेंद्र उर्फ लहान्या अशोक महाजन (३१, रा. तळेले कॉलनी, जुना खेडी रोड) याला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, ही कारवाई दि. ३० सप्टेंबर रोजी, अजिंठा चौफुली परिसरात करण्यात आली.शनिपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतून हद्दपार केलेला महेंद्र महाजन अजिंठा चौफुली परिसरात फिरत असल्याची माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना मिळाली. पोउनि दीपक जगदाळे, पोहेकॉ दत्तात्रय बडगुजर, पोलिस नाईक प्रदीप चौधरी, पोकों रतन गीते, साईनाथ मुंढे यांनी महाजन याला अटक केली. एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या