हातभट्टीची दारु करणाऱ्या ७ ठिकाणी पोलिसांची कारवाई : गावठी हातभट्टीची दारु आणि कच्चे रसायन केले नष्ट !
जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – शिरसोली शिवारात अवैधरित्या सुरु असलेल्या गावठी हातभट्टीची दारु करणाऱ्या सात ठिकाणी एमआयडीसी पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत ११ हजार ४६० लिटर सुमारे ५ लाख ४३ हजार रुपये किंमतीची गावठी हातभट्टीची दारु आणि कच्चे रसायन नष्ट केले.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की,शिरसोली शिवारातील जंगलामध्ये अवैधरित्या गावठी हातभट्टीची दारु तयार केली जात होती. एमआयडीसी पोलिसांनी गुरुवारी पहाटेच्या सुमारास विशेष मोहीमेतंर्गत त्याठिकाणी तयार केल्या जाणाऱ्या सात दारु तयार करण्याच्या भट्टया उद्ववस्थ केल्या. ही कारवाई पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, सफौ अधिकार पाटील, पोना प्रदीप पाटील, योगेश बारी, नितीन ठाकूर, शुध्दोधन ढवळे, गणेश ठाकरे, तुषार गिरासे, नाना तायडे, किरण पाटील, मंदार पाटील, सिध्देश्वर डापकर, रतन गिते, चंद्रकांत पाटील यांच्या पथकाने केली.