Sunday, April 27, 2025
Homeआरोग्यहिंदी महाविद्यालयाच्या रा.से.यो. चे विशेष शीतकालीन शिबिराचे आयोजन

हिंदी महाविद्यालयाच्या रा.से.यो. चे विशेष शीतकालीन शिबिराचे आयोजन

हिंदी महाविद्यालयाच्या रा.से.यो. चे विशेष शीतकालीन शिबिराचे आयोजन :-
भुसावळ  खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी   -श्री संत गाडगेबाबा हिंदी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना द्वारा दि. १-१-२०२५ ते ७-१-२०२५ या अवधीत सात दिवशीय शितकालीन शिबिराचे आयोजन ग्रामपंचायत कंडारी येथे करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन श्रीमान एडवोकेट महेश दत्तजी तिवारी’, अध्यक्ष श्रीमान डॉ. रविकांत जी परदेशी व विशेष अतिथी माननीय संजय देवरे व श्रीमान नरेश बाविस्कर यांच्या शुभहस्ते होणार आहे. या शिबिरात दररोज बौद्धिक प्रबोधन होणार असून त्यात प्रमुख वक्ता म्हणून डॉ. अर्चना नेहते, डॉ. गौरी खानापूरकर, श्री राजीव शर्मा, तसेच डॉ. जगदीश प्रसाद सूचीक या मान्यवरांना आमंत्रित

 

करण्यात आले आहे. शिबिरात विविध क्रीडा स्पर्धा प्रार्थना बौद्धिक चर्चा, श्रमदान व सांस्कृतिक कार्यक्रमाचे ही आयोजन करण्यात आले आहे. शिबिराचे आयोजन रा. से. यो. चे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर रमेश जोशी ,आणि कार्यक्रम अधिकारी डॉ. सुधीर शर्मा व डॉ. विवेक जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. शिबिरापूर्वी प्रशिक्षण वर्गाचे आयोजनही दि. ३१ डिसेंम्बर रोजी करण्यात आले होते. त्या कार्यक्रमात शिबिराविषयीची प्रस्तावना कार्यक्रम अधिकारी डॉ. विवेक जोशी यांनी मांडली व शिबिराविषयी माहिती देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच कार्यक्रम अधिकारी डॉ. सुधीर शर्मा यांनी शिबिराचे उद्देश स्पष्ट करत सर्व आवश्यक सूचना विद्यार्थ्यांना दिल्या तसेच शिस्तीचे पालन करावे असे सांगितले अध्यक्ष डॉ. रमेश जोशी यांनी सेवा व्रताची माहिती देत गाडगे बाबाची शिकवण ‘सेवा परमो धर्म’ व मानव सेवा हीच ईश्वर सेवा आहे असे सांगत विद्यार्थ्यांनी नेहमी श्रमदान करावे व स्वच्छतेचे पालन करावे असे सांगितले कार्यक्रमात सर्व प्राध्यापक उपस्थित होते. आभार प्रदर्शन डॉ. विवेक जोशी यांनी केले कार्यक्रमात शिबिरार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या