हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे जयंतीनिमित्त जिल्हा स्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – दि.२३ जाने.२०२५ रोजी असलेल्या हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त भुसावळ शहरात भव्य जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा दोन गटात ठेवण्यात आलेली आहे. ५ ते १० वी लहान गटा साठी 2.5किलो मिटर व १६ वर्षांवरील सर्वान साठी खुला गट ७ किलो मिटर अंतर ठेवण्यात आलेले आहे .
बालगट : इयत्ता ५ ते १० वी
प्रथम पारितोषिक रू.३००० व मानचिन्ह.
द्वितीय पारितोषिक: रू.२००० व मानचिन्ह.
तृतीय पारितोषिक:रू १००० व मानचिन्ह.
खुला गट : वय वर्ष १६ वरील सर्व स्पर्धक.
प्रथम पारितोषिक : रू.५००० व मानचिन्ह.
द्वितीय पारितोषिक: रू.३००० व मानचिन्ह.
तृतीय पारितोषिक:रू २००० व मानचिन्ह. याप्रमाणे बक्षीसे ठेवण्यात आले आहे सदर स्पर्धा ही प्रवेश पूर्णतः निःशुल्क आहे.प्रत्येक स्पर्धकाला सहभाग प्रमाण पत्र मिळणार आहे स्पर्धेचा दिनांक:२३ जाने.२०२५(गुरुवार)
स्पर्धेची वेळ : 7 वाजता आहे तर
स्पर्धेचा धाव मार्ग:लहान गट सपर्धेचा मार्ग सरदार वल्लभभाई पटेल चौक…दगडी पूल …शिवाजी महाराज पुतळा पांडुरंग टॉकीज …बाजारपेठ पोलीस स्टेशन…गांधी पुतळा मार्गे…पुन्हा सरदार वल्लभ भाई पटेल येथे समाप्ती होईल .
तसेच खुला गट मार्ग सरदार वल्लभभाई पटेल पासून सुरवात…लाईफ केयर हॉस्पिटल…नाहटा कॉलेज चौफुली…अष्टभुजा मंदिर मार्ग…बाजार पेठ पोलीस स्टेशन…गांधी चौक मार्गे पुन्हा सरदार वल्लभभाई पटेल येथे समाप्ती तरी जास्तीत जास्त सपर्धकानी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन शिवसेना परिवार तर्फे करण्यात आलेले आहे .
अधिक माहिती साठी खालीत व्यक्तीशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे
संपर्क : विनोद गायकवाड मो9923439949
एन एस म्हस्के मो 9823648270
दिपक धांडे 9371277236
निलेश महाजन 9307663441
बबलू बारहाते 9823321999