Sunday, March 16, 2025
Homeजळगावहिंदू योद्धा गणेश मंडळ श्री गणेश मूर्तीची स्थापना तालुकाध्यक्ष उमेश फेगडे यांच्या...

हिंदू योद्धा गणेश मंडळ श्री गणेश मूर्तीची स्थापना तालुकाध्यक्ष उमेश फेगडे यांच्या हस्ते

तहसीलदार यांच्या हस्ते श्रीची आरती.

यावल खान्देश लाईव्ह न्युज प्रतिनिधी – यावल शहरातील सुंदरनगर मधील हिंदू योद्धा गणेश मंडळ तर्फे श्री गणेश मूर्तीची स्थापना भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष उमेश फेगडे यांच्या हस्ते करण्यात आली तर यावल तहसीलदार सौ.मोहन माला नाझिरकर यांच्यासह त्यांच्या पतीच्या हस्ते श्री गणेशाची आरती करण्यात आली आहे.

यावल तहसीलदार यांच्या पतीसह स्वागत हिंदू योद्धा गणेश मंडळ अध्यक्ष मुकेश कोळी यांनी केले यावेळी गणेश मंडळाचे उपाध्यक्ष धनराज फालक,खजिनदार लक्ष्मण बारी,सचिव अनुराग फालक,राहुल धनगर,आशु पाटील,संजय पाटील, किशोर फेगडे,बबलू बारी,राहुल चौधरी सर्व मंडळाचे कार्यकर्ते सुंदर नगर मधील महिला पुरुष,कार्यकर्ते, मुलं मुली मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या