हिरा मारोती येथे १७ डिसेंबर रोजी शिवशक्ती वाहतूक सेने तर्फे भंडारा
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – हिरा मारोती फुलगाव शिवार येथे १७ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता भुसावळ येथील शिवशक्ती मॅटडोर सेनेतर्फे भंडारा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून गोरखनाथ बाबा , वाहतुक शाखेचे एपीआय उमेश महाले, बाजार पेठचे पोलीस निरिक्षक राहुल वाघ , परिवहन अधिकारी सौरभ पाटील , माजी आमदार संतोष चौधरी , प्रहार संघटनेचे अनिल चौधरी ,साई सेवक पिंटू कोठारी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत .कार्यक्रमात उपस्थित राहण्याचे आवाहन शिवशक्ती वाहतुक सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजु ठाकूर यांनी केले आहे .