हॉटेल नरीमन पॉईंट मालक २५ लाखांचे फसवणुकीचे गुन्हयातील कृष्णा उपाध्याय व सुनील तिवारी यांचा अटकपूर्व जामिन मंजूर.
भुसावळ दि.२२ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
भुसावळ शहरातील टेमी व्हिला येथे राहणाऱ्या व्यापाऱ्याने दिलेल्या धनादेशाचा गैरवापर करून सुमारे २५ लाख ५ हजार ६०० रूपयांची फसवणूक बाबत भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन
येथे फिर्यादी अदिल रूसी एन कावीना,( हॉटेल नरीमन पॉईंटचे मालक ) रा. टेमी व्हिला,
अमरदिप टॉकीज रोड,भुसावळ यांनी त्यांच्या ओळखीचे कृष्णा संजय उपाध्याय व सुनिल
नारायण तिवारी रा.विठ्ठल मंदिर वॉर्ड या दोन्ही विरूध्द बाजारपेठ पोलीस स्टेशन भुसावळ
येथे भारतीय न्याय संहिता कलम ३ ( ५ ) ३०६ , ३१६ ( २ ), ३१७ ( ४ ), ३३६ ( ३), ३४० ( २ ) अन्वये फिर्याद दाखल केली व आरोप केले की,सदरील गुन्हा दि.२ जानेवारी २०२५ रोजी दाखल झाला.या गुन्हयाचे व्यथित होवून कृष्णा संजय उपाध्याय व सुनिल नारायण तिवारी या दोघांनी मा.
जिल्हा सत्र न्यायालय भुसावळ समोर अटकपूर्व जामीन अर्ज नं. २५ / २५ दाखल केला.सदरील
जामीन अर्जाची सुनावणी पुर्ण झाल्यानंतर मा.जिल्हा व सत्र न्यायालय भुसावळ यांनी वरील
दोन्ही आरोपींना अटकपूर्व जामीन अर्ज शनिवार दि.१८ जानेवारी २०२५ रोजी मंजूर केले.सदरील दोन्ही आरोपी तर्फे ॲड.राजेंद्र टी. राय यांनी बाजू मांडली.