Monday, March 17, 2025
Homeगुन्हा२१ वर्षीय महिला घरी आलेली असताना धमकावत तिच्यावर अत्याचार !

२१ वर्षीय महिला घरी आलेली असताना धमकावत तिच्यावर अत्याचार !

२१ वर्षीय महिला घरी आलेली असताना धमकावत तिच्यावर अत्याचार !

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – पाणी भरण्यासाठी २१ वर्षीय महिला घरी आलेली असताना तिला धमकावत तिच्यावर अत्याचार करण्यात आला. ही घटना १७ सप्टेंबर रोजी रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका परिसरात घडली आहे.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की,याप्रकरणी ३० सप्टेंबर रोजी रामानंदनगर पोलिस ठाण्यात सुभाष चव्हाण याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका परिसरात मध्य प्रदेशातील एक कुटुंब वास्तव्याला आहे. या कुटुंबातील महिलेला सुभाष चव्हाण याच्या पत्नीने पाणी भरून ठेवण्याविषयी सांगितले होते. त्यानुसार ही महिला तेथे गेली असता त्यावेळी चव्हाण याने दरवाजा बंद केला व महिलेशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. महिलेने प्रतिकार केला असता तिला धमकावत तिच्यावर अत्याचार केला. महिलेने आरडाओरड केल्यानंतर तिचा पती तेथे गेला असता चव्हाण तेथून पळून गेला.

दरम्यान, याप्रकरणी महिलेने ३० सप्टेंबर रोजी रामानंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून सुभाष चव्हाण याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि. कैलास दामोदर करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या