Sunday, March 16, 2025
Homeजळगाव२१ वर्षीय युवकाने गळफास घेऊन केली आत्महत्या

२१ वर्षीय युवकाने गळफास घेऊन केली आत्महत्या

२१ वर्षीय युवकाने गळफास घेऊन केली आत्महत्या

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – अमळनेर तालुक्यातील तासखेडे येथील २१ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २४ रोजी उघडकीस आली आहे. तासखेडे येथील पंकज चंद्रकांत पाटील (वय २१) या युवकाने २४ रोजी दुपारी १२ ते २ वाजेदरम्यान गावठाण शिवारातील त्यांच्याच खळ्यात आत्महत्या केल्याची घटना ग्रामस्थांच्या निदर्शनास आली.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, खळ्यातील पत्री शेडला असलेल्या लोखंडी अँगलला सुतीच्या दोरीच्या सहाय्याने त्याने गळफास घेतला. काही ग्रामस्थांच्या मदतीने त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी करुन त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी अमळनेर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. तपास पो.हे.कॉ. संदेश पाटील करत आहेत. मयत पंकज याचे वडील चंद्रकांत बापू पाटील हे शेती करतात. तर तरुणाच्या अकस्मात मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या