२२ मार्च जागतिक जलदिन सर्वांनी विविध माध्यमातून जल प्रतिज्ञा घेत साजरा करावा !
पर्यावरण तज्ञ सुरेंद्रसिंग पाटील संचालक पर्यावरण जागर प्रतिष्ठान महाराष्ट्र
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – २२ मार्च जागतिक जल दिन त्यानिमित्त आपल्या राज्यात १६ मार्च ते २२मार्च पर्यंत जल सप्ताहाचा आयोजन करण्यात आलेले असल्याचे पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे संचालक डॉ. सुरेंद्रसिंग पाटील यांनी सांगितले आहे.पाणी हेच जीवन असून आपणास व आपल्याबरोबर सर्व सजीवांना जीवन जगण्यासाठी प्राणवायू सोबत आवश्यक असलेले पाणी निसर्गाकडून ही मिळालेली अनमोल देणगी असून तिचे जतन करणे व त्याचा वापर काटकसरीने करणे गरजेचे आहे.
पाण्याशिवाय पृथ्वीवरील सर्व सजीव जिवंत राहू शकत नाही. 22 मार्चपर्यंत असलेल्या या सप्ताहात सर्व शासकीय निमशासकीय कार्यालय महाविद्यालय पूर्व माध्यमिक माध्यमिक शाळा तसेच सर्व प्रकारच्या शैक्षणिक संस्था तसेच जिल्हा तालुका व गाव पातळीवर चर्चासत्र कार्यशाळा जलदिंडी प्रभात फेरी या अशा अनेक प्रकारच्या माध्यमातून जलप्रतिज्ञा चे आयोजन करण्यात यावे. पृथ्वीवरील पाण्याचा मोठ्या प्रमाणात मानव वापर करत त्याचा वापर काटकसरीने करण्यासाठी पाणी आडवा पाणी जिरवा या अंतर्गत पाणी जिरवण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग शोषखड्डे हे सुद्धा पाणी टिकण्यासाठी महत्त्वाचे असून त्याचे महत्त्व या निमित्ताने सांगावे. शासनामार्फत ठिकठिकाणी बंधाऱ्यांची तसेच शेततळे पाणी टिकवण्यासाठी निर्मिती करणे आवश्यक असल्याचेही डॉ. सुरेंद्रसिंग पाटील त्यांनी सांगितले आहे.पाणी टिकण्यासाठी व काटकसरीने वापरण्यासाठी विविध ठिकाणी जल प्रतिज्ञा जलसप्ताहाच्या निमित्ताने प्रत्येकाने घ्यावी.