Wednesday, March 26, 2025
Homeजळगाव२८ वर्षीय महिलेने राहत्या घरातील स्वयंपाक खोलीमध्ये गळफास घेत केली आत्महत्या !

२८ वर्षीय महिलेने राहत्या घरातील स्वयंपाक खोलीमध्ये गळफास घेत केली आत्महत्या !

२८ वर्षीय महिलेने राहत्या घरातील स्वयंपाक खोलीमध्ये गळफास घेत केली आत्महत्या !

यावल खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – यावल तालुक्यातील किनगाव बुद्धक गावात निलीमा कोळी (वय २८) या महिलेने आपल्या राहत्या घरातील स्वयंपाक खोलीमध्ये गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना शनिवार घडली, तेव्हा या प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, किनगाव बुद्रुक ता. यावल येथील रहिवासी नीलिमा संजय कोळी (वय २८) ही विवाहिता शनिवारी आपल्या घरी होती. दरम्यान, तिने आपल्या घरातील स्वयंपाक घरात दोर बांधून गळफास घेतला हा प्रकार तिचे पती संजय भागवत कोळी यांच्या निदर्शनास येताच त्यांनी धाव घेतली आणि विळ्याने दोर कापला. दोर कापल्यानंतर महिला जमिनीवर कोसळली आणि तिच्या डोक्याला दुखापत झाली. तेव्हा तातडीने त्याला तेथून यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले.रुग्णालयात ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. तुषार सोनवणे यांनी तपासणी करून महिलेला मृत घोषित केले. तेव्हा या प्रकरणी संजय कोळी यांच्या खबरीवरून यावल पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सदर, पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक विनोदकुमार गोसावी, पोलिस उपनिरीक्षक सुनील मोरे करीत आहे. मयत महिलेच्या पश्चात पती, दोन मुलं, एक मुलगी असा परिवार आहे

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या