Sunday, March 16, 2025
Homeजळगाव७ फेब्रुवारी रोजी जय गणेश जेष्ठ नागरिक संघाचा १३वा वर्धापन दिन !

७ फेब्रुवारी रोजी जय गणेश जेष्ठ नागरिक संघाचा १३वा वर्धापन दिन !

७ फेब्रुवारी रोजी जय गणेश जेष्ठ नागरिक संघाचा १३वा वर्धापन दिन !

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – भुसावळ येथील सुरभी नगरात जय गणेश जेष्ठ नागरिक संघाचा १३वा वर्धापन दिन व नूतन कार्यकारिणी पदग्रहण समारंभ दिनांक ७ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला .त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठांना मार्गदर्शन करताना उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील यांनी ज्येष्ठांचे कायदा व अधिकार याविषयी माहिती देताना पाल्यांना आर्थिक नियोजनाबाबत शिक्षण दिले गेले पाहिजे असे प्रतिपादन केले. माझ्याकडे ज्येष्ठांच्या समस्यांचे निराकरण कार्य असून जेष्ठाना जास्तीत जास्त न्याय देण्याचे काम करत असतो.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जय गणेश फाउंडेशनचे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे होते प्रमुख अतिथी भुसावळ विभागाचे उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील डी वाय एस पी कृष्णांत पिंगळे व कार्यक्रमाचे उमेश नेमाडे यांच्या हस्ते श्री गणेश पूजनाने व  स्व. अरुण मांडाळकर  सर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. विजय चौधरी यांनी स्वागत गीत सादर केले प्रास्ताविक संघाचे सचिव ज्ञानदेव इंगळे यांनी केले प्रमुख अतिथी जितेंद्र पाटील कृष्णांत पिंगळे व कार्यक्रमाचे अध्यक्ष उमेश नेमाडे यांचा संघाचे अध्यक्ष राजेंद्र बावस्कर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच सर्व निमंत्रित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले प्रसंगी प्रमुख अतिथी उपयोगी विभागीय अधिकारी जितेंद्र पाटील यांनी ज्येष्ठांनी आपले कायदे व अधिकार याविषयी सखोल माहिती घ्यावी तसेच प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या शारीरिक व मानसिक आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबाबत  सखोल मार्गदर्शन केले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष उमेश नेमाडे यांनी जय गणेश जेष्ठ नागरिक संघ यांचे कार्य उत्तरोत्तर प्रगतीपथावर आहे हे स्पष्ट करून संघ राबवित असलेल्या असलेल्या उपक्रमांचे  व सभासदांच्या उपक्रमशीलतेचे कौतुक केले यावेळी संघाचे उपाध्यक्ष दिलीप तिडके यांना संघ गौरव पुरस्कार श्रीमती सुमन साळसिंगीकर, वामन किसन पाटील यांना संघ भूषण पुरस्कार शांताराम बोबडे यांचा विशेष सेवा गौरव पुरस्कार देऊन प्रमुख अतिथीच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले तसेच संघाचे नूतन अध्यक्ष डॉक्टर सुधा खराटे यांचा प्रमुख अतिथी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला शकुंतला बालाजी वाले व वासुदेव दांडगे यांना संघातील सर्वात ज्येष्ठतम सभासद म्हणून सन्मानित करण्यात आले.

प्रसंगी वार्षिक नियतकालिक “अनुभूती” या अंकाचे प्रमुख अतिथींच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले तसेच सन 2025 26 साठी नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली यात डॉक्टर सुधा खराटे (अध्यक्ष) दिलीप तिडके (सचिव) डी एस पाटील (कोषाध्यक्ष) व उर्वरित पदाधिकाऱ्यांसह नूतन कार्यकारिणी अध्यक्ष सुधा खराटे यांनी घोषित केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सल्लागार दिनकर जावळे  सर यांनी तर उपस्थितांचे आभार पोपट पाटील यांनी मानले. कार्यक्रमास भुसावळ नगरातील नामांकित संस्थांचे पदाधिकारी तसेच पंचक्रोशीतील  सर्व ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते .कार्यक्रम यशस्वीतेसाठी सचिव ज्ञानदेव इंगळे कोषाध्यक्ष शांताराम बोबडे सल्लागार दिनकर जावळे सर शालिग्राम पाचपांडे ,  डी एस पाटील कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी व सभासदांनी परिश्रम घेतले

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या