ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने वार्षिक पुरस्कार समारंभ वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारेंच्या हस्ते संपन्न !
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – भुसावल तालुका ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने वार्षिक पुरस्कार समारंभ माननीय वस्त्रोद्योग मंत्री माननीय संजयजी सावकारे यांच्या हस्ते संपन्न झाला आहे.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, दिनांक 15 जानेवारी 2025 रोजी भुसावळ तालुका अथलेटिक्स असोसिएशन च्या वतीने 2023, 2024 वार्षिक पुरस्कार सोहळा माननीय कॅबिनेट वस्त्रोद्योग मंत्री महाराष्ट्र माननीय संजयभाऊ सावकारे यांच्या हस्ते त्यांच्या भुसावळ येथील संपर्क कार्यालयात आयोजित करण्यात आलेला होता. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख अतिथी वस्त्रोद्योग मंत्री माननीय संजयभाऊ सावकारे व इतर पदाधिकारी भुसावळ येथील असोसिएशनचे सर्व पदाधिकारी यांच्या हस्ते खेळाडूंचे प्रेरणास्थान मेजर ध्यानचंद जी यांच्या फोटोला नमन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली होती कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी वस्त्रोद्योग मंत्री माननीय संजय भाऊ सावकारे यांच्या हस्ते २३,२४ चा विशेष योगदान पुरस्कार माननीय श्री जयप्रकाशजी शुक्ला व सौ. नीलंबरी शिंदे यांना देण्यात आले. उत्कृष्ट प्रशिक्षक म्हणून सौ. ममता जांगिड, लोकेंद्र बुगले, इरफान शेख तसेच विविध स्पर्धांमध्ये यश मिळवणारे उत्कृष्ट खेळाडू सिंड्रेला पवार, विराट चौधरी, प्रथमेश ठाकूर यांचा सत्कार करण्यात आला तसेच पर्यावरण प्रेमी श्री. सुरेंद्र सिंग पाटील यांना पी. एच. डी. मिळाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.कार्यक्रमात प्रमुख अतिथी श्री भावेश चौधरी, गौरव आवटे, भैया महाजन श्रेयस इंगळे ,वेद ओझा, प्रशांत पाटील सर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी भुसावळ तालुका ॲथलेटिक्स असोसिएशन चे अध्यक्ष श्री. चंद्रकांतजी निकम. उपाध्यक्ष योगेंद्रजी हरणे, राहुल महाजन, सचिव रवींद्र जी चोपडे, कार्यकारी सचिव गोपीसिंग राजपूत, खजिनदार उदय महाजन, सलाहकार रमण भोळे सर सरोजकुमार, गुड्डू कुमार गुप्ताजी, डॅनियल पवार, डोंगरसिंग महाजन, अरुण भिसे, दीपक भोळे, जयंत गौर या सर्वांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमण भोळे सर यांनी केले . आभार प्रदर्शन संघटनेचे सचिव श्री रवींद्रजी चोपडे यांनी केले.