Thursday, November 21, 2024
Homeगुन्हाअनैतिक प्रेमसंबंधातून साकेगावात महिलेची हत्या ; संशयीतास अटक !

अनैतिक प्रेमसंबंधातून साकेगावात महिलेची हत्या ; संशयीतास अटक !

अनैतिक प्रेमसंबंधातून साकेगावात महिलेची हत्या ; संशयीतास अटक !

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथे अनैतिक प्रेमसंबंधातून प्रियकराने विवाहित महिलेची हत्या केल्याची घटना बुधवार (ता. २५) रात्री ११.३०वा.दरम्यान घडली. सोनाली कोळी ( वय २६ ) असे मृत महिलेचे नाव असुन साकेगावातील भिलाटी क्षेत्रात राहत होती. भुसावळ तालुका पोलिस स्थानकात हत्त्येप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असुन संशयीत आरोपीला अटक करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, सोनाली कोळी ही आपल्या पती व मुलीसोबत साकेगाव येथील भिलाटी क्षेत्रात राहत होती. संशयीत आरोपी सागर रमेश कोळी (वय २८ )रा. साकेगाव याच्या सोबत सोनालीचे अनैतिक संबंध होते. मात्र गेल्या काही दिवसांपासुन सोनाली व तीचा प्रियकर सागर यांच्यात वारंवार भांडणे होत असत. मात्र बुधवार ( ता. २५ ) रात्री ११.३० वाजेच्या सुमारास फिर्यादी विनोद कुंभार यांच्या घरासमोर सागर रमेश कोळी हा सोनाली महेंद्र कोळी हिस मोठया आवाजता शिवीगाळ करून मारहाण करीत असल्याचे दिसले भांडण सुरू असतांना विनोद सुभाष कुंभार (वय२८)रा. साकेगाव भवानीनगर यांनी त्यांच्या तील भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला मात्र संशयीत याने कुंभार यांचे समक्ष सोनाली हिच्या पाठीवर पोटाच्या बाजूला उजव्या हाताला असे शरीरात सात ठिकाणी चाकू भोसकून गंभीर जखमी केले कुभांर यांनी अडवण्याच्या प्रयत्न केला मात्र त्यांच्या उजव्या हाताला चाकू लागुन दुखापत झाली आहे. याबाबत विनोद कुभांर यांच्या फिर्यादि वरून भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात सागर कोळी विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रात्री जखमी सोनाली हीस गावातील आनंद ठाकरे यांनी भुसावळ ग्रामिण रूग्णांलयात ( ट्रामा केअर सेंटर ) उपचारार्थ दाखल केले मात्र वैद्यकिय अधिकारी डॉ. भुषण भोळे यांनी तीला मृत घोषीत केले. तर गुरुवार ( ता. २६ )सकाळी सोनालिचे डॉ. भोळे यांनी शवविच्छेदन करून सोनाली कोळीचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

भुसावळ तालुका पोलिस स्थानकात सदर घटनेसंदर्भात माहिती मिळताच पोलिस ठाण्याचे पोनि महेश गायकवाड, एपीआय खंडेराव, ए एसआय. बाळू पाटिल, पोलिस कर्मचारी संजय तायडे, वाल्मीक सोनवणे, जगदीश भोई आदीनी घटनास्थळी धाव घेत चौकशी केली असता संशयीतआरोपी सागर कोळी यास ताब्यात घेतले याप्रकरणी पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास भुसावळ तालुका पोलिस्टेशनचे एपीआय खंडेराव करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या