अमळनेर तालुक्यात जुन्या भांडणावरूण दोन गटात हाणामारी… गुन्हा दाखल !
अमळनेर खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – अमळनेर तालुक्यातील सारबेटे जुन्या वादावरून झालेल्या हाणामारी झाली असून अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आले आहे
याबाबत सविस्तर माहिती अशी की सरफराज खान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सरफराज खान हे सव्वीस ऑक्टोबर रोजी साडेनऊ वाजता घरी असताना इमरान खान जाकीर खान याच्यासोबत इतर जणांनी येऊन त्यांची कॉलर पकडून रस्त्यावर ओढले व धारदार शस्त्राने वार केला आहे .तसेच त्याच्या सोबत असलेले सलमान खान , हनिफ खान व इतर लोकांनी फिर्यादीस लाथा बुक्क्यांनी मारहाण करून तसेच लोखंडी रॉडने छातीमध्ये मारहाण करून जखमी केले आहे.त्याच वेळी माझा भाचा फैजल खान घरातून बाहेर आला असता यास सुद्धा त्यांनी शस्राने डोक्यात वार करून जखमी केले आहे.यावेळी शेजारील लोकांनी भांडण मोडून आम्हाला अमळनेर येथे आणले होते.अमळनेर पोलीस स्टेशन कडून मेडिकल मेमो दिल्यानंतर त्यांना ग्रामिण रुणालयात प्राथमिक उपचार झाल्यानंतर जखमींना जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे.यावेळी घराजवळ येवुन या व्यक्तींनी आमच्यावरती हल्ला केला आहे असा सरफराज खान यांनी आरोप केला आहे .
या प्रकरणी इमरान खान जाकीर खान सलमान खान जाकीर खान अरिफ खान हनिफ खान ना जिम खान गुलतात खान गुलाम खान रसूल खान गुलताज खान हनिफ खान , मुस्तफा खान हशील खान , शकील खान अशा आठ संशयिता विरुद्ध अमळनेर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर फिर्यादी सह परिवारावर जळगाव येथे सिविल हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत.घटनेचा अमळनेर पोलीस स्टेशनचे अधिकारी रामकृष्ण कुमावत करीत आहेत .