अल्पवयीन मुलीचा अश्लील व्हिडीओ केला तयार : एक अटकेत
जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – तालुक्यातील एका गावातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला नयन भालेराव याने व्हिडीओ कॉल करून तिचा अश्लील व्हिडीओ तयार करीत तिचा व्हिडीओ व्हायरल करण्यात आला. ही घटना डिसेंबर २०२२ ते १८ ऑक्टोबर २०२४ दरम्यान घडली.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, याप्रकरणी नयनसह जळगावातील एका मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून नयनला अटक केली आहे तालुक्यातील एका गावातील शिक्षण घेत असलेल्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीची धामणगाव, ता. जळगाव येथील नयन भालेराव याच्यासोबत ओळख निर्माण होऊन नंतर दोघांमध्ये प्रेम फुलले. त्यादरम्यान तरुणाने केलेल्या व्हिडीओ कॉलवेळी तरुणीचे अश्लील व्हिडीओ तयार केले. त्यावरून तरुणीने प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिला. तरुणाने हे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन जवळीक साधण्याचा प्रयत्न केला असता तरुणीने विरोध केला. त्यानंतर त्याने तो व्हिडीओ जळगावातील एकाला पाठविला.दोघांनीही हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करीत या तरुणीची बदनामी केली. याप्रकरणी तरुणीने तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून दोघांविरूद्ध गुन्हा दाखल केला. यातील नयन याला अटक केली असून त्याची न्यायालयीन कोठाडीत रवानगी करण्यात आली