अल्पवयीन मुलीला मध्यरात्री पळविले : तिघांविरुद्ध गुन्हा दाखल!
पारोळा खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीस मध्यरात्रीच्या सुमारास गावातील तीन संशयितांनी पळवून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत पारोळा पोलिसांत तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, अल्पवयीन मुलगी १७ वर्षांची असून, ती बुधवारी रात्री परिवारासह जेवण करून घरात झोपली होती. पहाटे आई-वडिलांनी बघितले असता मुलगी घरात नव्हती. शोधाशोध करूनही ती सापडली नाही. अधिक शोध घेतला असता विनोद संजय गायकवाड, शिवदास पोपट मोरे, वैजनाथ संजय गायकवाड या संशयितानी अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्याची घटना घडल्याचे दिसून आले. याबाबत मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून पारोळा पोलिसांत तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, मुलीस फूस लावून तिघेजण पळवून घेऊन गेले आहेत.