अल्पवयीन मुलीस फुसलावून पळवुन नेत अत्त्याचार केल्या प्रकरणी भुसावळात एकास १० वर्षे सक्तमजूरी शिक्षा सुनावली!
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – भुसावळ शहरातील एका भागात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला फुस लाऊन पळऊन नेत वारंवार अत्त्याचार केल्याप्रकरणी मुलीच्या आईने २०१५मध्ये बाजारपेठ पोलिसात दिलेल्या तक्रारी वरून न्यायालयाने चौकशी अंती आरोपीस दोषी धरून तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा प्रमाणे शुक्रवार ( ता. ८ ) १० वर्षे सक्त मजुरी व५०००रू दंडाची शिक्षा सुनावली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, भुसावळच्या एका भागातील अल्पवयीन तरूणी ला(ता.२८मे२०१५ ) फुस लावुन पळवून नेल्याप्रकरणी तिच्या आईने (ता.२९ मे२०१५) ला भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन येथे आरोपी गौतम शिवचरण चौव्हाण याच्या विरूध्द तक्रार दिली होती. त्या अनुशंगाने आरोपी गौतम विरूध्द बाललैगिंक अत्याचार कायदा कलम (३अ ) व( 4 ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पिडीत मुलगी ही आई वडीलांना मिळुन आल्या नंतर आरोपींने दिलेल्या धमक्यामुळे सुरूवातीला तिने अत्त्याचाराच्या घटने बद्दल सांगितले नव्हते मात्र नंतर तिची भिती निधुन गेल्या नंतर तिने आरोपी गौतम ने तिला त्याचे नातेवाईक असलेले इतर आरोपीकडे वेगवेगळ्या गावी घेवून जावून अत्त्याचार केल्याचे सांगितल्याने गुन्ह्यात कलम वाढविण्यात आले होते. तर इतर आरोपींनी गौतम यांस सहकार्य केल्याचा आरोप होता. आरोपी विरुध्द भुसावळ येथील विशेष न्यायाधिश डिएल गायकवाड यांचे न्यायालयात खटल्याचे कामकाज सुरू होवून सरकार तर्फे पीडीता तिची आई तसेच पीडीतेची तपासणी करणाऱ्या डॉ. नम्रता अच्छा तसेच जन्म नोंदणी अधिकारी व तपासी अधिकारी पी.एस.आय आशिष पी. शेळके आदीं सह ९ लोकांच्या साक्षी तपासण्यात आल्या साक्षीपुराव्या अंती आरोपी गौतम विरूध्द अत्त्याचाराचा आरोप सिध्द झाल्याने
न्यायालयाने त्यास दोषी धरून शुक्रवार (ता. ८) दहा वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली. आरोपी गौतम यास ठोठावण्यात आलेल्या शिक्षेत५०००रु.दंड व दंडा पैकी ४०००/- रूपये पिडीतेला देण्याचे न्यायालयाने आदेशीत केले. उर्वरित सहकार्य करणारे आरोपी विरूध्द दोष सिध्द होवू शकला नाहि त्यामूळे त्यांना दोषमुक्त करण्यात आले.सदर गुन्हया कामी सरकार पक्षातर्फे सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अॅड विजय खडसे यांनी कामकाज पाहिले त्यांना पैरवी अधिकारी म्हणून पी. एस.आय रफिक शेख कालु यांनी सहकार्य केले. गुन्हयाचा तपास पी.एस.आय आशिष शेळके यांनी केला होता.