आंतरराष्ट्रीय मॅक फेअर मध्ये भुसावळ तालुक्यातील चौघांची निवड
वरणगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – दोन वर्षांपूर्वी गुजरात मधील जुनागड येथे झालेल्या राष्ट्रीय भारतीय सायन्स टेक्नो फेस्टिवल मध्ये भुसावळ तालुक्यातील चौघांनी सहभाग घेतला होता. या ठिकाणी केलेल्या सादरीकरणामुळे त्यांची लखनऊ येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय मॅक फेअर 2024 साठी निवड करण्यात आली.
दोन वर्षांपूर्वी गुजरात राज्यात रमण सायन्स टेक्नॉलॉजी फाउंडेशनच्या वतीने भारतीय सायन्स टेक्नो फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सायंटिस्ट कॅरेक्टर प्ले रोल व सायन्स क्विझ या स्पर्धेत यश संपादन केले होते यामुळे रमण सायन्स टेक्नॉलॉजी फाउंडेशनच्या वतीने तयार करण्यात आलेल्या संघात भुसावळ तालुक्यातील महात्मा गांधी विद्यालयातील मनीष माळी, तोषल तेली, शिक्षक सुनील वानखेडे तसेच भुसावळ शहरातील सेंट अलायसिस हायस्कूलमधील पार्थ वानखेडे यांची निवड करण्यात आली आहे. 6 सप्टेंबर ते 9 सप्टेंबर दरम्यान लखनऊ मधील सिटी मॉन्टेसरी स्कूलमध्ये हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. निवड करण्यात आलेल्या संघात राजस्थानचे 4, मध्य प्रदेशातील 1 व महाराष्ट्रातील 3 अशा 8 विद्यार्थ्यांची निवड या स्पर्धेसाठी करण्यात आली आहे या स्पर्धेत विविध देशातील विद्यार्थी सहभागी होणार आहे या ठिकाणी सायन्स ड्रामा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स शाप की वरदान यावर वादविवाद, सायन्स ग्रुप डिस्कशन, सायंटिस्ट कॅरेक्टर स्पीच, डिस्कवरी ऑफ सायन्स ओलंपियाड, सायन्स मॉडेल डिस्प्ले, मॅथ रोबो रेस, वाईल्ड लाईफ कंजर्वेशन यावर प्रोजेक्ट यासह विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत भुसावळ तालुक्यातील तिघे विद्यार्थी व एक शिक्षक सहभागी होणार आहे या निवडीबद्दल त्यांचे कौतुक शालेय समितीचे चेअरमन चंद्रकांत बढे, दि वरणगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष वंदना पाटीलकेल, उपाध्यक्ष ज्ञानदेव झोपे सचिव चंद्रशेखर झोपे सर्व संचालक मंडळ मुख्याध्यापक वंदना चव्हाण यांनी केले.