Friday, May 2, 2025
Homeजळगावआकाशवाणी चौकात भीषण अपघात : तरुणीच्या दोन्ही पायांचा झाला चुराडा !

आकाशवाणी चौकात भीषण अपघात : तरुणीच्या दोन्ही पायांचा झाला चुराडा !

आकाशवाणी चौकात भीषण अपघात : तरुणीच्या दोन्ही पायांचा झाला चुराडा !

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – गेल्या काही महिन्यापासून शहरातील आकाशवाणी चौकात नेहमीच अपघाताच्या घटना घडत असतांना आता १ मे रोजी ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीवर मागे तरुणीचे दोन्ही पायांचा चेंदामेंदा झाला असून दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी 1 मे रोजी रात्री 8 वाजता घडली आहे. जखमींवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहे.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, शहरातील महाबळ परिसरातील रहिवासी नयन मिलिंद तायडे (वय 22) आणि रोहित संजय माळी (वय 21, रा. राधाकृष्ण नगर, जळगाव) असे दोन जण जखमी झालेल्यांची नावे आहे. जळगाव शहरातील आकाशवाणी चौकाकडून तरुणी नयन तायडे आणि तरुण रोहित माळी हे दुचाकीने आकाशवाणी चौकाकडून उड्डाणपुलाकडे वळण घेत असताना मागून येणाऱ्या ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत तरुणी रोडवर पडल्याने तिच्या पायावर ट्रॅकचे दोन्ही चाक गेल्याने तिचा दोन्ही पायांचा चेंदामेंदा झाला. तर रोहित हा गंभीर जखमी झाला. दरम्यान ही घटना घडल्यानंतर स्थानिक नागरिकांनी त्यांना उचलून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले आहे. या घटने संदर्भात पोलीस ठाण्यात अद्याप पर्यंत कुठलेही नोंद करण्यात आलेली नाही.
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या