हत्या की आत्महत्या अनेक प्रश्न उपस्थित ; यावल पो.स्टे.ला गुन्हा दाखल!
यावल खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – सातपुडा पर्वताच्या अतिदुर्गम भागातील तथा यावल तालुक्यातील गाडऱ्या – जामन्या आदिवासी या वस्तीच्या भागातून धक्कादायक माहीती समोर आली आहे या आदिवासी भागात एका ३० ते ४० वर्ष वयोगटातील महिलेचा अत्यंत कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने परिसरातील आदिवासी बांधवांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या घटने याबाबत यावल पोलीस पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे. दरम्यान महिलेचा मृत्यू संशयास्पद असल्याची,घातपात झाल्याची दाट शक्यता निर्माण झाली असून ही हत्या आहे की आत्महत्या. याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे.
याबाबत मिळालेली माहीती अशी की,यावल तालुक्यातील अतिदुर्गम भागातील गाडऱ्या जामन्या या ठीकाणी निळकंठ कुटिया जवळ कोरडया तलाव असून, या क्षेत्रातुन वन विभागाचे कर्मचारी जात असतांना सोमवार १४ एप्रिल २०२५ रोजी त्यांना तलावात अनोळखी अंदाजे ३० ते ४० वर्षीय माहिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह दिसुन आला. दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्यावर यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी तात्काळ दखल घेत आपल्या पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेतली.याबाबत यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असुन,या अनोळखी महीलेचा मृत्यु कशामुळे झाला याची माहिती अद्यापपर्यंत समोर आलेली नाही , प्राथमिक माहितीनुसार महिलेसोबत घातपात झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मरण पावलेल्या महिलेचा मृतदेह पोलीसांनी ताब्यात घेत , प्रथमदर्शनी महीलेचा मृत्यु संशयास्पद वाटल्याने तिचा मृतदेह हा यावलहून जळगाव येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.