Tuesday, January 28, 2025
Homeजळगावआश्रय फाउंडेशनने केला यावल रावेर व्हावे तालुक्यातील शिक्षकांचा सन्मान ) भावी पिढीच्या...

आश्रय फाउंडेशनने केला यावल रावेर व्हावे तालुक्यातील शिक्षकांचा सन्मान ) भावी पिढीच्या संस्कारासाठी शिक्षक खरे आधारस्तंभ..

(आश्रय फाउंडेशनने केला यावल रावेर व्हावे तालुक्यातील शिक्षकांचा सन्मान ) भावी पिढीच्या संस्कारासाठी शिक्षक खरे आधारस्तंभ… डॉ. कुंदन फेगडे  फैजपूर प्रतिनिधी – शिक्षक हे कोणाचेही गुलाम नाहीत तर ते युवा पिढीवर संस्कार घडवणारे आणि भारताची भावी पिढी घडवणारे आधारस्तंभ आहेत समाजात शिक्षकांचा मान सन्मान झालाच पाहिजे असे प्रतिपादन आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. कुंदन फेगडे यांनी व्यक्त केले.
आश्रय फाउंडेशन, यावलच्या वतीने आज फैजपूर येथे रावेर – यावल तालुक्यातील मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला. फैजपूरच्या खंडोबा वाडी देवस्थान परिसरात आयोजित या कार्यक्रमास अध्यक्षस्थानी राज्य शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक दिलीप पाटील होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून प. पू. पवनदास महाराज, पी. एस. सोनवणे सर यांची उपस्थिती लाभली.
यावेळी महाराष्ट्र शासनाचा सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त शिक्षिका अश्विनी कोळी (न्हावी), मुख्याध्यापक दिलीप पाटील (अभोडा) आणि जिल्हा परिषदेचा पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक जितेंद्र पाटील (मोरगाव) आणि दीपक चव्हाण यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास डॉ. पराग पाटील, डॉ. भरत महाजन, डॉ. सोहन महाजन, डॉ.विलास पाटील, श्री संदिप भारंबे, श्री कन्हैया चौधरी, श्री शुभम तांबट, श्री राम शिंदे उपस्थित होते. कार्यक्रमात उपस्थित सर्वच मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गिरीशा कोळी यांनी केले तर सौं अश्विनी कोळी यांनी आभार मानले. कार्यक्रमास यावल – रावेर तालुक्यातून शेकडो मुख्याध्यापक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी आश्रय फाउंडेशनचे सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या