तरुणीला भेटण्यासाठी आलेल्या तरुणाची पोलिसांनी केली चौकशी !
यावल खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – सोशल मीडिया / नेटवर्क म्हणजे फेसबुक व्हाट्सअप याच्या माध्यमातून उत्तर प्रदेशातील एका तरुणाने आपल्या महाराष्ट्रातील एका तरुणीशी संपर्क साधून ओळख करून माहिती घेऊन तो तरुण सरळ त्या तरुणीच्या घरी काल शनिवार दि.३१ ऑगस्ट २०२४ रोजी बेधडक आला आणि जबरदस्तीने बोलचाल करू लागल्याने त्या तरुणाला ग्रामस्थांनी चांगलाच पाहुणचार देऊन पोलिसांच्या स्वाधीन केल्याची घटना यावल तालुक्यात घडली आहेत
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, त्या मुलीने यावल पोलीस स्टेशनला फिर्याद न दिल्याने यावल पोलिसांनी साधी नोंद करून चौकशी करून त्या तरुणाला सोडल्याची माहिती मिळाली. तालुक्यातील एका तरुणीची फेसबुक,व्हाट्सअप नेटवर्क सोशल मीडियाच्या माध्यमातून उत्तर प्रदेशातील एका तरुणांसोबत ओळख झाली या ओळखीचा फायदा घेत तो तरुण शनिवारी सरळ उत्तर प्रदेशातून महाराष्ट्रात यावल तालुक्यात अट्रावल येथे त्या मुलीच्या घरी पाहुणा म्हणून आपल्या दोन मित्रांसह दाखल झाला.आणि त्या तरुणी व तिच्या कुटुंबाशी शाब्दिक वाद घालायला सुरुवात केली.
हे सिनेमा स्टाईल लैला मजनू प्रमाणे बेकायदा कृत्य आजूबाजूच्या लोकांसह ग्रामस्थांना समजल्याने त्या आलेल्या तरुणासह त्याच्या दोन मित्रांना ग्रामस्थांनी चांगलाच पाहुणचाराचा चोप देऊन यावल पोलिसांच्या ताब्यात दिले.परंतु त्या तरुणींने यावल पोस्टेला फिर्याद न दिल्याने गुन्हा नोंद न झाल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी दिली.फिर्याद न दिल्याने तरुणाची चौकशी व एनसी नोंद करून तरुणाला ताकीद दिल्याचे समजले. फेसबुक व्हाट्सअप सोशल मीडिया माध्यमातून ओळख देऊन मैत्री करताना कसा वाईट अनुभव आला हे सर्व समाजाला ग्रामस्थांना समजून आले.याबाबत ग्रामीण भागासह शहरात जोरदार चर्चा सुरू आहे.