“उबाठा” पक्षाला खिंडार; उपजिल्हाप्रमुखासह पदाधिकाऱ्यांनी मुंबईला शिवसेनेत केला प्रवेश
-एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वरणगाव, जामनेर, यावल येथील ८५ शिवसैनिकांनी मशाल सोडून धनुष्यबान घेतला हाती
भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी वरणगाव – उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे उपजिल्हाप्रमुख, भुसावळ उप तालुकाप्रमुख, वरणगाव उप शहरप्रमुख, ग्राहक स्वसंरक्षण कक्षाचे उपजिल्हा संघटक यांच्यासह, सामाजिक महिला कार्यकर्त्यांसह भुसावळ, जामनेर, यावल येथील ८५ कार्यकर्त्यांनी मुंबईला सोमवारी सायंकाळी शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश केला.
शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यावर प्रेरीत होऊन स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे विचार पुढे घेऊन जाणारे आणि
गोरगरिबांचे ‘कॉमन मॅन’ ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात लाडका भाऊ म्हणून ज्यांना ओढकले जातात. त्यांच्या कार्यावर प्रेरीत होऊन तसेच पालकमंत्री गुलाबराव पाटील, मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील उपजिल्हाप्रमुख विलास मुळे, भुसावळ तालुकाप्रमुख सुभाष चौधरी, वरणगाव उपशहरप्रमुख राम शेटे, ग्राहक संरक्षण कक्षाचे उपजिल्हा संघटक नितीन देशमुख, काहूरखेडचे सरपंच पती विनोद पाटील, वरणगावच्या सामाजिक महिला कार्यकर्त्या सविता माळी, कलाबाई माळी, उर्मिला चौधरी, रूनल वाणी, भुसावळच्या प्रतिभा सूर्यवंशी यांच्यासह जामनेर, यावल, भुसावळ असे सर्व रावेर विभागातून जवळपास ८५ कार्यकर्त्यांनी मुंबईला शिवसेनेत जल्लोषात मशाल सोडून हातात धनुष्यबाण घेतला.
यावेळी जिल्हाप्रमुख समाधान महाजन, भुसावळ विधानसभा प्रमुख संतोष माळी, यावलचे तालुकाप्रमुख राजेंद्र काठोके, वरणगाव शहर संघटक दुर्गेश बेदरकर, सामाजिक कार्यकर्ते दिलीप गायकवाड यांच्यासह आदी पदाधिकारी यांची उपस्थिती होती.