एका २३ वर्षीय तरुणाने घेतली विहिरीत उडी !
यावल खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – तालुक्यातील दहिगाव येथील दत्त नगरातील एका २३ वर्षीय तरुणाने १४ मार्च रोजी विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली. याबाबत यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे कि, सोमानंद उर्फ सोनू कमलाकर पाटील असे मयताचे नाव आहे. सोमानंद याने १४ मार्च रोजी दुपारी ३:३० वाजेच्या सुमारास गावालगत असलेल्या किरण मधुकर नेवे यांचे शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. त्याचा मृतदेह १५ मार्च रोजी सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास काढण्यात आला. २० तासानंतर हा मृतदेह विहिरीच्या बाहेर काढण्यात यश मिळाले. तुषार सोनकी यांनी शवविच्छेदन केले. मयताच्या पश्चात आई-वडील, बहीण, काका, काकू असा परिवार आहे. आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप समजू शकले नाही. तपास नरेंद्र वाघुळदे करीत आहेत.