एड्स पासून स्वसंरक्षण व जनजागृती आवश्यक- डॉ. उमेश चौधरी
फैजपूर खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – एड्स सारख्या महाभयंकर आजाराने सध्या अवघ्या विश्वाला विळखा घातलेला असताना प्रत्येक व्यक्तीने या महाभयंकर आजारापासून स्वतःचे संरक्षण करून समाजातील प्रत्येक घटकापर्यंत एड्स संबंधी जनजागृती करावी. एड्स होण्याची कारणे, गैरसमजुती, उपाययोजना व उपचार पद्धती यासंबंधी शास्त्रोक्त माहिती घेऊन घरोघरी संदेश पोहोचवणे हे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे असे मत डॉ. उमेश चौधरी यांनी व्यक्त केले.
ते फैजपूर येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयात बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर फैजपूर व सावदा शहरातील डॉ. नितीन महाजन, डॉ. सुनील पाटील, डॉ. गिरीश लोखंडे, डॉ. कीर्ती लोखंडे, डॉ. श्रीकांत कुलकर्णी, डॉ. भरत महाजन, डॉ. भाग्यश्री महाजन, डॉ. एकता सरोदे आणि डॉ. गौरव चौधरी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघुळदे, उपप्राचार्य डॉ. मनोहर सुरवाडे, उपप्राचार्य डॉ. कल्पना पाटील, उपप्राचार्य डॉ. हरीश नेमाडे तसेच वैद्यकीय तपासणी समिती प्रमुख प्राध्यापिका नाहीदा कुरेशी, समिती सदस्य प्रा. भोजराज पाटील, प्रा. आरती भिडे, प्रा. रोशन केदारे आणि प्रा. धीरज खैरे आदि मान्यवर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यात विद्यार्थ्यांनी मनातील विविध शंकांचे निरसन करून घेतले व एड्स संबंधी जनजागृती साठी कटिबध्द असल्याने मनोगत व्यक्त केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र वाघुडे यांनी एड्स आजारासंबंधी व्यापक कार्य करण्याची आवश्यकता असून यामध्ये आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी हिरीरीने सहभाग घेऊन समाजातील शेवटच्या घटकापर्यंत एड्स संबंधी जनजागृती करावी असे आवाहन करीत आलेल्या डॉक्टर महोदयांचे हार्दिक आभार व्यक्त केले.
या वेळी 139 विद्यार्थी व 104 विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.