ऑलिंपिक विश्वविजेता एम सी मेरी कोम यांचे भुसावळ शहरात जंगी स्वागत
भुसावळ (प्रतिनिधी) बाॅक्सिंग मध्ये सहा वेळा विश्वविजेती ऑलिंपिक विजेता एमसी मेरी कोम यांचे भुसावळ शहरातील अष्टभुजा मंदिराजवळ मोठे जंगी स्वागत करण्यात आले . शहरातील मुख्य मार्गावरून त्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी ठिक ठिकाणी त्यांचे स्वागत करुन फुलांची उधळण करण्यात आली.
शहरातील आई फाउंडेशन अंतर्गत छत्रपती शाहू महाराज बॉक्सिंग अकॅडमी आयोजित राणी लक्ष्मीबाई पहिली मुली व महिलांचे ऑल इंडिया बॉक्सिंग टूर्नामेंट ६ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबर दरम्यान शहरातील महात्मा गांधीं यांच्या पुतळ्या जवळ कोरोनेशन क्लब भुसावळ येथे आयोजित करण्यात आलेली आहे.
त्यानिमित्ताने एम. सी. मेरी कोम
भुसावळ शहरात आल्या होत्या.
त्यांच्या स्वागतासाठी महिलांनी सफेद रंगाची साडी ,डोक्यात भगवा फेटा व हातात हिरव्या रंगाच्या बांगड्या घालून तिरंग्याचे प्रतिक सादर केले होते. शिस्तबद्ध पध्दतीने खेळाडूंच्या उपस्थितीत विश्वविजेत्या एम. सी. मेरी कोम यांची भव्य मिरवणूक रॅली काढुन जामनेर रोडवरील अष्टभुजा देवी मंदिरा पासून पांडुरंग टाकीज, बाजारपेठ पोलीस स्टेशन, लोखंडी पुलाखालून शहर पोलीस स्टेशन, महात्मा गांधींचा पुतळा ते कोरोनेशन हाॅल येथे मिरवणुकीचा समारोप करण्यात आला. कोरेनेशन हाॅलच्या मैदानावर महिलांनी त्यांचे औक्षण केले. यावेळी बाॅक्सिंग खेळाडूंनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी छत्रपती शाहू महाराज बॉक्सिंग अकेडमीचे अध्यक्ष नरेंद्र मोरे, विशाल सपकाळे, गणेश वाघोदे, नितेश तायडे, कृष्णा सोनी, समाधान बाविस्कर, बबलू नेतकर, आई फाऊंडेशनचे अध्यक्ष भरत पाटील, अभय आखाडे, किरण पाटील, प्रीतम टाक, डॉक्टर सुवर्णा गाडेकर, वंदना सोनवणे, राजश्री सोनवणे , छाया पाटील