ओझरखेडयात अवैध दारू भट्टी उध्वस्त ;भुसावळदारूबंदी विभागाची कारवाई, ६८ हजाराचे कच्चे रसायन नष्ट
भुसावळ, ता. २५ : भुसावळ तालुक्यातील दारूबंदी विभागाच्या अधिकाऱ्यांनी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन त्या अनुशंगाने एक्शन मोडवर येऊन ओझरखेडा गावात मंगळवार ( ता. २४ ) दुपारी ४वा.सुमारास अवैध हातभट्टी दारू ठीकाणावर अचानक धाड टाकुन ६८ हजाराचे कच्चे रसायन आणि तयार केलेली दारू नष्ट केली आहे.
भुसावळ तालुका दारूबंदी अधिकारी सुजित कपाटे यांना ओझरखेडा गावा लगतच्या तलावा जवळील पाटसरीत एका मंदीरा जवळ अवैध गावठी दारूची हातभट्टी गेल्या कित्तेक वर्षापासुन सुरु असल्याची गोपनि माहिती मंगळवार ( ता. २४ ) मिळाली त्या अनुशंगाने विधानसभा निवडणुक आधिच दारूबंदी विभागाचे अधिकारी सुजित कपाटे एक्शन मोडवर येऊन त्यांनी मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे सुजित कपाटे यांनी अजय गावंडे, राहाय्यक दुय्यम निरीक्षक, ईश्वर बाविस्कर व अन्य कर्मचाऱ्यांचे पथक घेऊन ओझरखेडा गावालगत असलेल्या तलावाजवळील पाटचारी मध्ये मिळालेल्या माहिती प्रमाणे शोध घतला असता. पथकाला अवैध दारूची हातभट्टी आढळून आली मात्र दारू भट्टीचा मालक आणि कर्मचारी अधिकारी व कर्मचाऱ्यांरी आल्याचा सुगावा लागताच पसार झाले. मात्र पथकातील दारूबंदी अधिकारी सुजित कपाटे व कर्मचाऱ्यांनी अवैध दारूच्या हातभट्टीवरील ६८ हजार रू.किंमतीचे २००लिटरचे ८ बॅरल कच्चे रसायन व तयार केलेली दारू नष्ट क करून विभागीय आयुक्त डॉ विजय सुर्यवंशी, अप्पर आयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपआयुक्त नाशिक श्रीमती वर्मा, अधिक्षक जळगाव विठ्ठल भुकन यांचे मार्गदर्शना खाली कारवाई केली. विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन दारूबंदि विभागाकडून कारवाईचे सातत्य ठेवले जाणार आहे अशी माहिती दारूबंदी तालुका अधिकारी सुजित कपाटे यांनी दिली