कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा कार्यक्रमाचा समारोप.
यावल दि.२८ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्र. प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे व उपप्राचार्य प्रा. एम. डी. खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा कार्यक्रम समारोप संपन्न झाला
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा.रामेश्वर निंबाळकर यांनी विद्यार्थ्यांना अभिजात मराठी भाषेबद्दल सांगितले की प्राचीन भाषा,भाषेचे वय दिड लाख वर्षे जुनी असावी,फायदे बोलींचा अभ्यास, संशोधन साहित्य मोठ्या प्रमाणात होत आहे.असे सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.आर.डी. पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की मराठी ही महाराष्ट्र आणि गोवा या राज्याची राजभाषा आहे.आज वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या बोली बोलल्या जातात मराठी भाषा जुनी आहे. त्यात मोठ्या प्रमाणात साहित्य लेखन झाले आहे साहित्य संमेलने,साहित्य मेळावे,परिषदा यांमुळे भाषेचा प्रचार व प्रसार झाला आहे. असे सांगितले
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन कु.दिक्षा पंडित हीने केले तर आभार प्रा.हेमंत पाटील यांनी मानले कार्यक्रमाला महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सुधीर कापडे, डॉ.हेमंत भंगाळे, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा. संजय पाटील प्रा. सुभाष कामडी, प्रा.प्रशांत मोरे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मिलिंद बोरघडे,संतोष ठाकूर,दुर्गादास चौधरी,प्रमोद भोईटे यांच्यासह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले