Thursday, November 21, 2024
Homeजळगावकला शिक्षक राजू साळींच्या कुंचल्यात साकारले साळी समाजाचे आराध्य दैवत भगवान जिव्हेश्वर

कला शिक्षक राजू साळींच्या कुंचल्यात साकारले साळी समाजाचे आराध्य दैवत भगवान जिव्हेश्वर

 कला शिक्षक राजू साळींच्या कुंचल्यात साकारले साळी   समाजाचे आराध्य दैवत भगवान जिव्हेश्वर 
फैजपूर खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – प्रतिनिधी साळी समाजाचे आराध्य दैवत भगवान जिव्हेश्वर जयंतीचे औचित्य साधून श्री. एस. बी. चौधरी हायस्कूल, चांगदेव येथील कला शिक्षक राजू साळी यांनी कुंचल्यातून भगवान जीव्हेश्वर पैंटिंग तयार करण्यात आली असून सदर पैंटिंग पोष्टर कलर माध्यमात असून पैंटिंग देखणी व सुंदर आहे.साळींनी बोलतांना सांगितले की, ज्या वेळेस पृथ्वीची निर्मित झाली त्यावेळेस मानवाची निर्मिती सुद्धा झाली मानव नग्नवस्थेत होता.त्याची लज्जा रक्षणासाठी वस्त्र निर्मिती झाली पाहिजे त्यासाठी सर्व देव, महादेवाकडे गेले. महादेवाला संपूर्ण हकीकत सांगितली. मग महादेवाने आपल्या जिव्हेच्या अग्रभागातून कोटी सूर्याच्या प्रकाशाने एक बालकास जन्म दिला. त्या बालकाचे नाव जिव्हेश्ववर ठेवण्यात आले. भगवान जिव्हेश्वर यांच्या कडे कापड निर्मितीचे काम देण्यात आले.प्रथम महावस्त्र तयार करून माता पार्वतीस देण्यात आले.अशी अख्यायीका आहे. श्रावण महिन्यात संपूर्ण भारतात साळी समाज जिव्हेश्वर जयंती उत्सव मोठया थाटात साजरा केला जातो.
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या