Friday, November 22, 2024
Homeजळगावकला शिक्षक राजू साळींच्या घरी देवाधीदेव महादेव गणपती बाप्पाच्या रूपात

कला शिक्षक राजू साळींच्या घरी देवाधीदेव महादेव गणपती बाप्पाच्या रूपात

कला शिक्षक राजू साळींच्या घरी देवाधीदेव महादेव गणपती बाप्पाच्या रूपात

फैजपूर खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – भारत देश धार्मिक परंपरा जपणारा असून गणेश चतुर्थी श्री गणेशाचा जन्मदिवस असून संपूर्ण देशात मोठ्या उत्सवात साजरा केला जातो. वैदिक धर्मात प्रथम पूजेचा मान गणपतीला दिला जातो. विघ्नहर्ता, बुद्धी, कला, व विज्ञानाचा संरक्षक तसेच हुशारी साठी गणपती प्रसिद्ध आहे. संपूर्ण महाराष्ट्रत गणपती उत्सव घरोघरी साजरा केला जातो.

विशेषतः मुंबई, कोकण, पुणे याठिकाणी मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. सतत कलेसाठी धडपड करणारे नाविण्याचा ध्यास मनी बाळगणारे श्री. एस. बी. चौधरी हायस्कूल, चांगदेव फैजपूर येथील रहिवासी यांनी आपल्या राहत्या घरी “श्रीं “ची पारंपरिक पद्धतीने विधिवत पूजा करून गणपतीची स्थापना करण्यात आली. सदर गणपतीआरस साठी पुठ्यांचा वापर करून टाकाऊ पासून टिकाऊ त्यावर रंगकाम करून पर्यावरण पूरक अशी आरस “केदारनाथ सेट” तयार करण्यात आला असून सेटवर आकर्षक विदयुत रोषणाई करण्यात आलेली आहे. तसेच राजू साळींचे मित्र सौरव कोळी आय. टी. इंजिनियर यांनी गणपतीची मूर्ती पर्यावरण पूरक तयार करून मूर्तीस रंगकाम साळींनी केले आहेत. महादेवाच्या रूपात गणपती मूर्ती तयार करण्यात आली असून सदर मूर्ती महादेव वाहन नंदीवर आरूढ झालेली दाखवण्यात आलेली आहेत.

मूर्ती आकर्षक सुंदर, देखणी बघितल्यावर मन प्रसन्न होते. सजावट तयार करण्याचा एकच उद्देश टाकाऊ पासून टिकाऊ तयार करणे व आपल्या हातून नवनिर्मिती कला घडत राहावी सर्वांच्या घराघरात पोहचावी युवा कलावंताना प्रेरणा मिळावी तसेच श्रींच्या आरती साठी कला क्षेत्रातील आध्यात्मिक, साहित्यिक, सामाजिक क्षेत्रातील लोकांना आरती साठी आमंत्रित केले जाते. आरास बघण्यासाठी गल्लीतील बालगोपालांची गर्दी होत असते. फैजपूर वासियांना एक प्रकारे पर्वणी ठरत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या